बर्मिंघम : वृत्तसंस्था
भारताने इंग्लंडवर वनडे मालिकेत पहिला विजय मिळवला. इंग्लंड दौ-यातील भारताचा हा पहिला विजय ठरला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २५८ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी २५९ धावांची गरज होती. भारताने या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शुभमन गिल आणि अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिला विजय मिळवला.
श्रेयस अय्यरने शुभमन गिलला चांगली साथ दिली. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या १०२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने इंग्लंडला ६ विकेटने पराभूत केले. आता दुसरा वनडे सामना १६ जुलै रोजी होणार आहे. भारताच्या डावाची सुरुवात समाधानकारक झाली नाही. रोहित शर्मा( ११) आणि विराट कोहली (५) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर नंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी डाव सावरला. शुभमन गिल ८० धावांची खेळी करुन दुखापतीमुळं मैदानाबाहेर गेला. श्रेयस अय्यर ३५ धावा करुन धावबाद झाला. के. एल. राहुल मोठी खेळी करु शकला नाही. यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने भारताला विजयापर्यंत पोहोचवले. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. अक्षरÞ पटेलने ५७ तर वॉशिंग्टन सुंदरने ५२ धावा केल्या.
जो रुटने इंग्लंडचा डाव सावरला
इंग्लडनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी ६१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर इंग्लंडची अवस्था ५ बाद ८० अशी होती. इंग्लंडची सहावी विकेट १०७ धावांवर पडली. यानंतर जो रुट आणि लियाम डॉसम यांनी ७ व्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. यानंतर इंग्लंडची सातवी विकेट २२८ धावांवर पडली. यानंतर त्यांचा डाव २५८ धावांवर आटोपला. भारतासाठी सर्वाधिक विकेट अक्षर पटेलने घेतल्या. अक्षर पटेलने इंग्लंडच्या ४ फलंदाजांना बाद केले. गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा यांनी दोन दोन विकेट घेतल्या तर, शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराहने एक-एक विकेट घेतली.
















