कायद्याचे पालन ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी

लातूर : प्रतिनिधी
कायद्याचे पालन करणे हे केवळ कायदेशीर बंधन नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.  दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विधी महाविद्यालयाच्या नवीन सेमिनार हॉलच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. यावेळी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबईचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मंगेश पाटील,
दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष ललितकुमार शहा, सचिव रमेश बियाणी, विशाल लाहोटी, अजिंक्य सोनवणे, संजय बोरा, अ‍ॅड. आशिष बाजपाई, अ‍ॅड. श्रीकांत उटगे, बार कौन्सिल ऑफ गोवा व महाराष्ट्राचे अ‍ॅड. जयंत जायभावे, अ‍ॅड. व्हि. डि. साळुंके, लातूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवकुमार जाधव, सचिव अ‍ॅड. गुरुप्रसाद येरटे, प्राचार्या डॉ. पूनम नाथानी उपस्थित होत्या.
भारतीय राज्यघटनेने आपल्याला अनेक अधिकार दिले आहेत. पण अधिकारांसोबत कर्तव्येही दिली आहेत. आपल्या अधिकारसोबतच आपण आपली कर्तव्ये पार पाडतो का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे सांगून ओक म्हणाले की, संविधान हा केवळ ग्रंथ नसून आपली जीवनशैली आहे. संविधान टिकवायचे असेल तर कायद्याचा आदर आणि पालन हाच एकमेव मार्ग आहे. सेमिनार हॉलच्या उद्घाटनाने विद्यार्थ्यांना संवाद, चर्चासत्र आणि कायदेशीर चर्चांसाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कारण वकील म्हणजे केवळ  न्यायालयात युक्तिवाद करणारा नाही. तर तो समाजात न्याय आणि कायद्याचे भान जागवणारा सेतू आहे. यावेळी कुलगुरू डॉ. चासकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचे महत्व अधोरेखित करताना वकिली व्यवसायासाठी आवश्यक प्रात्यक्षिक शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. यावेळी पाटील म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांने बोलायला का शिकले पाहिजे यावर भर दिला. कारण वकिली व्यवसायात संभाषण कौशल्य आवश्यक आहे. अ‍ॅड. बाजपाई यांनी ज्येष्ठ वकील बी. व्ही. कंकाळ यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून महाविद्यालयाचा भक्कम पाया रोवण्यात त्यांची भूमिका विशद केली.
यावेळी दयानंद विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. वाय. शेख, न्यायाधीश अभय शिरशीकर, न्यायाधीश विकास कुलकर्णी, न्यायाधीश वेदपाठक जे, न्यायाधीश जे. के. जोशी, न्यायाधीश ए. आर. कुरेशी, न्यायाधीश एस. डी. जगताप, न्यायाधीश व्ही. जी. इंद्राळे, न्यायाधीश प्रदीप शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. पूनम नाथानी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शुभांगी पांचाळ यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. गोपाळ पांचाळ यांनी केले. यावेळी दयानंद शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातील प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news