नागरिकांनी स्वाईन फ्लूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये: डॉ. रमेश भराटे

लातूर : प्रतिनिधी
सध्या बदलत्या वातावरणामुळे विविध प्रकारच्या श्वसनविकारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, स्वाईन फ्लू अर्थात एच-१एन-१ इन्फ्लुएन्झाबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांनी केले आहे. स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा एच-१एन-१ विषाणूमुळे होणारा  श्वसनाचा संसर्ग असून, संक्रमित व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकण्यामुळे निर्माण होणा-या श्वसनातील थेंबांद्वारे त्याचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी काळजी घेणे आणि
संसर्गाची लक्षणे दिसल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉ. भराटे यांनी सांगितले. स्वाईन फ्लूच्या प्रमुख लक्षणांमध्ये ताप, अंगात कणकण, नाक वाहणे किंवा बंद होणे, घसा दुखणे, खोकला, कफ, डोकेदुखी, स्नायू व सांधे दुखणे, अशक्तपणा आणि जास्त थकवा यांचा समावेश होतो. काही रुग्णांमध्ये मळमळ, उलटी किंवा जुलाबाची लक्षणेही दिसू शकतात. श्वास घेण्यास त्रास, वाढता दम, छातीत दुखणे, ओठ किंवा चेहरा निळसर पडणे, सतत वाढता ताप, चक्कर किंवा गोंधळ, तसेच प्रकृती सुधारल्यानंतर पुन्हा अचानक बिघडणे यासारखी लक्षणे  दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वाईन फ्लूची लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता वेळेत वैद्यकीय तपासणी व योग्य उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वत:हून औषधे घेण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. रमेश भराटे यांनी केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news