रेणापूर : प्रतिनिधी
येथील श्रीराम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल कुटवाड यांच्या नियतम वयोमानानुसार सेवापूर्तीनिमित्त बुधवार (दि. ३०) सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
अध्यक्षस्थानी रेणुका शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रविकांत अकनगिरे हे होते. मंचावर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद काकडे, पोलिस उपविभागीय अधिकारी राहूल केंगले, गटविकास अधिकारी सुमित जाधव, श्याम गोडभरले व पोलिस निरीक्षक सुधाकर देडे, रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदासराव कुटवाड, सचिव अॅड. पंडितराव उगीले, कोषाध्यक्ष ज्ञानोबा बरुरे, संचालक ओमप्रकाश गोडभरले, अनिता भातीकरे, अॅड. दीपक गोडभरले, अॅड. सुनील कुटवाड व सुधीर बरुरे यांची उपस्थिती होती. यावेळी रेणुका शिक्षण संस्था, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने प्राचार्य अनिल कुटवाड यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांसह पालक, आजी-माजी विद्यार्थी यांच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला. नूतन प्राचार्य जुबेरखाँ पठाण यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पुष्पा निकम यांनी केले. यावेळी अपेक्षा कुटवाड, डॉ. संगीता देशमुख, माजी विद्यार्थी विनोद रेड्डी, उत्तम पवार, संस्थेचे सचिव अॅड. पंडितराव उगीले, सेवानिवृत्त निवृत्त कॅफो श्रीरंग भूतडा व गटविकास अधिकारी सुमित जाधव यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्राचार्य अनिल कुटवाड म्हणाले की, संस्थेचे मार्गदर्शन, पालकांचा विश्वास, वरिष्ठांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचा स्रेह यामुळे माझा शैक्षणिक प्रवास सुखद झाला. या प्रवासात मिळालेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन अमृतेश्वर स्वामी यांनी तर श्रीप्रसाद उगीले यांनी आभार मानले. कार्यक्रमास तालुक्यातील प्राचार्य, शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आजी-माजी विद्यार्थी, शक्षिक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
















