न्यूयॉर्क/नवी दिल्ली : यंदा संपूर्ण जग एका मोठ्या भीषण संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. १८७७-७८ मध्ये अशीच घटना घडली होती, ज्या घटनेने संपूर्ण जगात हाहाकार उडाला होता, त्याची पुनरावृत्ती २०२७ मध्ये घडू शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत मिळत आहेत.
जगभरातील हवामान तज्ज्ञांकडून यंदाच्या मान्सूनबाबत धडकी भरवणारा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचे सावट आहे. यंदाचा अल निनो एवढा शक्तिशाली आहे की, यापूर्वी अशी घटना १८७७ मध्ये घडली होती. १८७७ मध्ये संपूर्ण जगात भीषण दुष्काळ पडला होता, त्या वर्षभरात दुष्काळामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले. त्यानंतर पुन्हा अशा कोणत्याही दुुष्काळाची नोंद झाली नाही. मात्र यावर्षी तशाच स्वरुपाच्या अल निनोचा प्रभाव पावसावर पडण्याचा अंदाज जगभरातील हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
प्रशांत महासागरच्या पृष्ठभागाचं तापमान झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा तीव्र प्रभाव पहायला मिळू शकतो असा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. यावर्षीचा अल निनो हा मेगा किंवा सुपर असू शकतो, अशी माहिती देखील हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. अल निनोची सुरुवात ही प्रशांत महासागरात होते, मात्र त्यानंतर त्याचा प्रभाव हा हळुहळू संपूर्ण जगावर पडतो. यंदा भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आणि मध्य अफ्रिका तसेच अमेझॉनचं संपूर्ण जंगल अल निनोच्या प्रभावाखाली येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जगावर मोठे संकट निर्माण झाले आहे.
भारतावर काय परिणाम?
यंदा देशात मान्सूनचे प्रमाण कसे राहणार? याबाबत भारतीय हवामान खात्याकडून पहिला अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजामुळे चिंता वाढली आहे. यंदा भारतासह राज्यातील मान्सूनवर अल निनोचं सावट असणार आहे. याचा मोठा फटका हा पावसाला बसू शकतो. अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. दरम्यान संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तयारीला सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत.

