39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनवडील झाल्यानंतर मी जबाबदार झालो

वडील झाल्यानंतर मी जबाबदार झालो

मुंबई : अभिनेता जॅकी श्रॉफने आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जॅकी उत्कृष्ट अभिनेता आहेतच पण त्यासोबत एक चांगला पती आणि वडील म्हणूनही बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान जॅकी आपले जुने दिवस आठवताना दिसला.

‘हीरो’ या चित्रपटापासून प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या जॅकीने आपल्या अभिनयाच्या जोरावर आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारून अनेक सुपरहिट चित्रपट दिले. दरम्यान, जॅकी त्याच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून सांगतो की, मी माज्या करिअरची सुरुवात अ‍ॅक्शन चित्रपटांपासून केली.

मी एकामागून एक धोकादायक अ‍ॅक्शन सीन करत होतो. तेंव्हा मला स्वत:ची पर्वा नव्हती. पण जेव्हा मी वडील झालो तेव्हा माज्यामध्ये अचानक बदल झाला. जेव्हा तुम्ही वडील बनता तेव्हा तुम्हाला समजते की तुमच्यावर केवळ स्वत:चीच नाही तर इतर कोणाची तरी जबाबदारी आहे. तुम्ही स्वत:ची जास्त काळजी घ्यायला सुरुवात करता. वडील होण्यापूर्वी मी प्रत्येक स्टंट स्वत: करायचो आणि दुखापत घेऊन घरी परतायचो, पण बाप झाल्यावर मला समजायला लागलं की मी हे सगळं करू शकत नाही. वडील झाल्यानंतरच मला माज्या जबाबदारीची जाणीव झाली.

शांत राहण्यामध्ये सर्वात मोठी ताकद

जॅकी श्रॉफने ज्युनियर आर्टिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हळूहळू त्याला चित्रपटांमध्ये नायकाच्या भूमिका मिळू लागल्या. जॅकी म्हणतो की, लोक माज्याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाही. मी फक्त माज्या मनाचे ऐकतो. माज्यासाठी माज्या मनाच्या शांतीपेक्षा मोठे काहीही नाही. गर्दीतही तुम्ही शांतपणे तुमचे मत मांडू शकता शांत राहण्यामध्ये खुप मोठी ताकद आहे, असे जॅकी म्हणतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR