28.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपने काँग्रेसची बँक खाती गोठवली; उमेदवारांना आर्थिक मदत करा

भाजपने काँग्रेसची बँक खाती गोठवली; उमेदवारांना आर्थिक मदत करा

मुंबई :
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने बँक खाती गोठावल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. भाजप लोकशाही संपवण्यासाठी खालच्या पातळीवर आली आहे, अशी टीका करत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.

भाजप ज्या पद्धतीने लोकशाही संपवण्यासाठी खालच्या पातळीवर आली आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी भाजप सरकारने काँग्रेसची खाते गोठवली आहेत. भाजपने इन्कम टॅक्सचा हिशेब दिला का हे सांगावे. लोकशाही वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे म्हणत काँग्रेस उमेदवाराचा आयएफएससी कोड जाहीर करणार आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला जी काही आर्थिक मदत लागेल ती द्यावी असे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून आावाहन करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

तसेच परिवारवाद हा शब्द वापरून भाजप भ्रम निर्माण करत आहे. अमित शहा यांचा मुलगा क्रिकेट बोर्डवर आहे. देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते, पंकजा मुंडेंचेही आमदार होते, याला परिवारवाद म्हणायचे नाही का? असा सवाल उपस्थित करत नाना पटोले यांनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

निवडणूक लढणार नाही..
मी प्रदेशाध्यक्ष असल्याने निवडणूक लढू शकणार नाही, ८० टक्के टीव्हीची यादी बरोबर होती, २० टक्के नवीन उमेदवार देऊ. नाना पटोले निवडणूक लढणार नाहीत ही भीती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढायला पाहिजे होती, असा टोलाही पटोलेंनी यावेळी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR