29.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनसलमानच्या घराबाहेर गोळीबार करणा-या २ आरोपींना अटक

सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणा-या २ आरोपींना अटक

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानाबाहेर १४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, संशयितांना गुजरातच्या भूज जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना मुंबईत आणले असून, पोलिसांनी अटक लेलेल्या संशयितांची छायाचित्रे प्रसिध्द केली आहेत.

रविवारी पहाटे सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला होता. या गोळीबारात कोणालाही कोणतीही दुखापत झाली नव्हती. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आरोपींनी गोळीबार करण्यासाठी जी मोटारसायकल वापरली होती ती वांद्रे परिसरातील चर्चजवळ सोडली आणि काही अंतर पायी चालत गेले. त्यानंतर त्यांनी वांद्रे रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी ऑटोरिक्षा घेतली.दरम्यान, तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने सोशल मीडियावर या घटनेची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे, त्यामुळे यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत, ते लवकरच समोर येईल.

सलमान खानचे आगामी चित्रपट

सलमान खानचा शेवटचा चित्रपट ‘टायगर ३’ होता. त्यामध्ये तो कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मीसोबत दिसला होता. अलीकडेच, ११ एप्रिल रोजी ईदच्या दिवशी सलमान आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटात झळकणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करत असून, दिग्दर्शन ए. आर. मुरुगादोस करत आहेत. ‘सिकंदर’ २०२५ च्या ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR