32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगआयआयएफएलच्या गोल्ड लोन वितरणावर बंदी

आयआयएफएलच्या गोल्ड लोन वितरणावर बंदी

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक ने आयआयएफएल फायनान्सला दणका देत त्याविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आरबीआयने आयआयएफएल फायनान्सला गोल्ड लोन वितरणावर बंदी घातली आहे असे असले तरीही कंपनी तिच्या सध्याच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओची सेवा सुरू ठेवेल. त्यामुळे आरबीआयच्या या निर्णयाचा जुन्या ग्राहकांवर काही परिणाम होणार नाही.

स्पेशल ऑडिटनंतर जर समाधानकारक निकाल आल्यास आयआयएफएल फायनान्सला दिलासा दिला जाऊ शकतो असे आरबीआयने म्हटले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेनंतर एका महिन्यात आरबीआयची ही दुसरी मोठी कारवाई आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ अंतर्गत आरबीआयने ही कारवाई केली आहे. आयआयएफएल फायनान्सला तत्काळ प्रभावाने कोणतेही गोल्ड लोन मंजूर न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनीच्या आर्थिक स्थितीच्या तपासणीदरम्यान, गोल्ड लोन वितरणामध्ये अनियमितता आढळून आली आहे. गोल्ड लोन वितरण आणि लिलावादरम्यान कंपनी सोन्याची शुद्धता आणि वजन याबाबत योग्य अहवाल देत नव्हती. याशिवाय कर्ज ते मूल्य गुणोत्तराचेही उल्लंघन होत होते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, आयआयएफएल फायनान्स कर्ज वितरण आणि वसुली दरम्यानही नियमांपेक्षा जास्त रोखे वापरत आहे. याशिवाय ग्राहकांवर आकारण्यात येणा-या शुल्काबाबतही पारदर्शकता ठेवली जात नव्हती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR