26.7 C
Latur
Monday, July 8, 2024
Homeसोलापूरसोलापूर शहरातील सरसकट खासगी पाणीपट्टी रद्द करा

सोलापूर शहरातील सरसकट खासगी पाणीपट्टी रद्द करा

सोलापूर – महापालिका प्रशासनाकडून शहरात लावण्यात आलेली सरसकट खाजगी पाणीपट्टी रद्द करावी अशी मागणी करत बेकायदा पाणीपट्टी वसुलीकडे विधानसभा अधिवेशनात भाजपचे आ. विजयकुमार देशमुख यांनी लक्ष वेधले.

मुंबई येथील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे आम दार विजय देशमुख न यांनी खाजगी नळ न पाणीपट्टीकडे लक्ष न वेधले. सोलापूर न महानगरपालिकेच्या ने वतीने सोलापूर शहरातील रहिवाशांना मिळकत करा सोबत सरसकट खाजगी पाणी बिल वाटप करण्यात येत आहे. हा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत आहे.

हा महत्वाचा मुद्दा उपस्थित करत नगर विकास विभागाचे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बेकायदा पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष वेधून घेत ही बेकायदा वसुली थांबण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान, सोलापूर महापालिकेने शहरात खाजगी नळ नाही त्या ठिकाणी सरसकट पाणीपट्टी आकारली आहे. तशी बिले देण्यात येत आहेत. यासंदर्भात संबंधित मिळकतदारांकडून नाराजीचा सूर होता. या विषयासंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत आवाज उठवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR