आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा रायगडमध्ये बुडून मृत्यू

रायगड : प्रतिनिधी
कोकणातील रायगड जिल्ह्यातील दिवे आगार समुद्र किनारी आज ८ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सर्वजण पुण्यातील आळंदी येथून सहलीसाठी आले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने आठही जण पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुण्यातील आळंदी येथून एका खासगी क्लासची सहल पर्यटनासाठी आली होती. त्यातील ८ जण समुद्रकिनारी पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील सर्व आठही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दिवे आगार येथे मृत पावलेले विद्यार्थी हे विनर्स अकॅडमीत शिक्षण घेत होते. ही खाजगी शिकवणी असून ते सर्वजण अकरावीचे शिक्षण घेत होते. ४२ विद्यार्थी आणि दोन शिक्षक असे ४४ जण आज दिवे आगारला ट्रिपसाठी गेले होते. त्यातील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, महाकाली वॉटर स्पोर्टसच्या कर्मचा-यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली. तसेच स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले. या दुर्घटनेने समुद्रकिनारी शोककळा पसरली आहे. दुर्घटनेतील सर्व मृतदेह बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|किनवट तालुक्यात पीक कापणी प्रयोगाला सुरुवात; ९ महसूल मंडळांत १०८ ठिकाणी होणार प्रयोग
01:21
Video thumbnail
Dharashiv|ऊसाला ५ हजार पहिली उचल द्या! धाराशिवमध्ये शेतकरी संघटना आक्रमक
03:37
Video thumbnail
Latur|लातूरकरांना पाण्यासाठी आणखी प्रतीक्षा! १ ऑक्टोबरपासून सहा दिवसांआड पाणीपुरवठा
02:54
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीविरोधात जिल्हा उपनिबंधक ॲक्शन मोडवर; लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी धाडी
03:14
Video thumbnail
Latur|कोयता गँगची दहशत अन् पोलिसांचा दणका! आरोपींची त्याच भागात धिंड
06:06
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उलटी हलगी आंदोलन
03:32
Video thumbnail
हिमायतनगर तहसीलसमोर शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली
02:55
Video thumbnail
Latur|शेतकऱ्याची नजर पडली अन् हरणाचा जीव वाचला; वनविभागाचं रेस्क्यू ऑपरेशन
01:18
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती
02:36
Video thumbnail
Latur|CCTV फुटेजच्या आधारे तिन्ही आरोपी अटकेत; ठाकरे चौकातील हल्ल्याचा पोलिसांनी लावला छडा
01:57
Video thumbnail
Maharashtra Drought 2026 | 265 तालुके दुष्काळग्रस्त | शेतकऱ्यांना मदत कधी? | मुद्दा महाराष्ट्राचा
57:19
Video thumbnail
कोयता गँगची दहशत पुन्हा? दोन विद्यार्थी जखमीविद्यार्थ्यांवर हल्ला अन् CCTV मध्ये थरार; लातुरात खळबळ
00:33
Video thumbnail
Latur|पाककलेतून आरोग्याचा संदेश; ६९ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
04:15
Video thumbnail
Latur|७ गाड्या, ४० जवान, दीड लाख लिटर पाणी; अखेर आगीवर नियंत्रण
03:57
Video thumbnail
Latur|१३ तासांची झुंज! अखेर सक्रॅप मार्केटमधील आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
01:42

Latest news