मुंबई : महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफी योजनेचा तिसरा हप्ता शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. एकूण ३,१६१ कोटी रुपये राज्यातील ३.२७ लाख शेतक-यांच्या बँक खात्यावर थेट वितरित करण्यात आले आहेत.
बँकांनी लावलेल्या जास्त व्याजदरामुळे हा हप्ता काही काळ रखडला होता. मात्र, आता हा तिढा सुटला असून, हजारो शेतक-यांना याचा मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे शेतक-यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. शेतक-यांचे कर्ज माफ करून त्यांना आर्थिक दिलासा देण्याचा हा प्रयत्न राज्य शासनाकडून सातत्याने सुरू आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतीत सक्षमीकरण होण्यास मदत होईल. कर्जमाफीच्या या टप्प्याने शेतक-यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची आशा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफी योजनेचा तिसरा हप्ता शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. एकूण ३,१६१ कोटी रुपये राज्यातील ३.२७ लाख शेतक-यांच्या बँक खात्यावर थेट वितरित करण्यात आले आहेत. बँकांनी लावलेल्या जास्त व्याजदरामुळे हा हप्ता काही काळ रखडला होता. मात्र, आता हा तिढा सुटला असून, हजारो शेतक-यांना याचा मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे शेतक-यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. शेतक-यांचे कर्ज माफ करून त्यांना आर्थिक दिलासा देण्याचा हा प्रयत्न राज्य शासनाकडून सातत्याने सुरू आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतीत सक्षमीकरण होण्यास मदत होईल. कर्जमाफीच्या या टप्प्याने शेतक-यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची आशा आहे.
वाढीव व्याजदरामुळे रखडली होती प्रक्रिया
राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर पहिल्या दोन टप्प्यांत तब्बल १० हजार ११५ कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यात यशस्वीपणे जमा केले होते. मात्र, तिस-या हप्त्याच्या वितरणावेळी एक तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. काही बँकांकडून शेतक-यांच्या थकीत कर्जावर प्रमाणापेक्षा जास्त व्याजदर आकारण्यात आल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. या तफावतीमुळे तिस-या हप्त्याचे वाटप तात्पुरते थांबवण्यात आले होते.
सुधारित माहितीनंतर वितरणास गती
या समस्येची दखल घेत सरकारने संबंधित बँकांना आकडेवारी आणि व्याजदराबाबत सुधारित (रिवाईज्ड) माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता अनेक बँकांकडून ही सुधारित माहिती प्राप्त झाली असून त्यानुसार पात्र शेतक-यांच्या खात्यात तिस-या हप्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या टप्प्यातील ३ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
उर्वरित रक्कमही लवकरच मिळणार
ज्या बँकांची सुधारित आकडेवारी आणि प्रक्रिया अद्याप बाकी आहे, ती पूर्ण झाल्यानंतर उर्वरित हप्त्याची रक्कमही तातडीने शेतक-यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. ब-याच दिवसांपासून रखडलेली कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होऊ लागल्याने ऐन हंगामात बळीराजाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.















