मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर वॉटर लिंकचा प्रस्ताव

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील बहुचर्चित मिसिंग लिंकच्या धर्तीवर आता महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एका अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रस्ताव समोर आला आहे. कोकणात दरवर्षी पुराच्या रूपात समुद्राला जाऊन मिळणारे अतिरिक्त पाणी पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील दुष्काळी भागात वळवण्यासाठी वॉटर लिंक टनेल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

किसान आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी हा क्रांतिकारी प्रस्ताव थेट राज्य सरकारसमोर मांडला असून, या योजनेमुळे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांची पाण्याची टंचाई कायमची दूर होऊ शकते, असा दावा केला आहे. मराठवाड्याला नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. यासोबतच विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही अनेकदा भीषण संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे या भागाचा दुष्काळ कायमचा संपेल, अशा दृष्टीने दीर्घकालीन नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक वर्षांपासून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजना जाहीर होतात. कालांतराने त्या हवेत विरतात. त्यामुळे मराठवाड्याच्या नशिबी कायम दुष्काळ आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून पाणी आणण्याच्या आतापर्यंत ब-याच योजना जाहीर झाल्या आहेत. आता किसान आर्मीने सरकारसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे.

कोकण भागात मान्सूनच्या काळात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि पुराचे अब्जावधी लिटर पाणी वाया जाऊन समुद्राला मिळते. कोकणातील तब्बल २४९.४३ टीएमसी अतिरिक्त पाणी एका विशाल बोगद्याद्वारे पश्चिम घाट ओलांडून मराठवाड्याच्या दुष्काळी पट्टयात वळवण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली. सरकारने या अगोदही ब-याच योजना जाहीर केल्या आहेत. दुष्काळी मराठवाड्याला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून पाणी आणण्याचे आश्वासन अनेकदा दिले गेले. आता किसान आर्मीच्या प्रस्तावाचा विचार झाल्यास कायमस्वरुपी पाणी उपलब्धतेचा मार्ग निघू शकतो.

या योजनेमुळे केवळ महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांचाच नव्हे तर पाण्यासाठी संघर्ष करणा-या शेजारील दाक्षिणात्य राज्यांचाही पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यास मोठी मदत होणार आहे. आता या प्रस्तावावर राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्राला फायदा
वॉटर लिंक प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना संजीवनी मिळणार आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंकप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा अंडरग्राउंड टनेल तयार केल्यास पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही आणि थेट आवश्यक त्या धरणांमध्ये पाणी पोहोचवता येईल, असे सांगण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|किनवट तालुक्यात पीक कापणी प्रयोगाला सुरुवात; ९ महसूल मंडळांत १०८ ठिकाणी होणार प्रयोग
01:21
Video thumbnail
Dharashiv|ऊसाला ५ हजार पहिली उचल द्या! धाराशिवमध्ये शेतकरी संघटना आक्रमक
03:37
Video thumbnail
Latur|लातूरकरांना पाण्यासाठी आणखी प्रतीक्षा! १ ऑक्टोबरपासून सहा दिवसांआड पाणीपुरवठा
02:54
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीविरोधात जिल्हा उपनिबंधक ॲक्शन मोडवर; लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी धाडी
03:14
Video thumbnail
Latur|कोयता गँगची दहशत अन् पोलिसांचा दणका! आरोपींची त्याच भागात धिंड
06:06
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उलटी हलगी आंदोलन
03:32
Video thumbnail
हिमायतनगर तहसीलसमोर शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली
02:55
Video thumbnail
Latur|शेतकऱ्याची नजर पडली अन् हरणाचा जीव वाचला; वनविभागाचं रेस्क्यू ऑपरेशन
01:18
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती
02:36
Video thumbnail
Latur|CCTV फुटेजच्या आधारे तिन्ही आरोपी अटकेत; ठाकरे चौकातील हल्ल्याचा पोलिसांनी लावला छडा
01:57
Video thumbnail
Maharashtra Drought 2026 | 265 तालुके दुष्काळग्रस्त | शेतकऱ्यांना मदत कधी? | मुद्दा महाराष्ट्राचा
57:19
Video thumbnail
कोयता गँगची दहशत पुन्हा? दोन विद्यार्थी जखमीविद्यार्थ्यांवर हल्ला अन् CCTV मध्ये थरार; लातुरात खळबळ
00:33
Video thumbnail
Latur|पाककलेतून आरोग्याचा संदेश; ६९ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
04:15
Video thumbnail
Latur|७ गाड्या, ४० जवान, दीड लाख लिटर पाणी; अखेर आगीवर नियंत्रण
03:57
Video thumbnail
Latur|१३ तासांची झुंज! अखेर सक्रॅप मार्केटमधील आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
01:42

Latest news