प्रत्येक नागरिकाचे आयुष्य मौल्यवान

नवी दिल्ली : कोणत्याही नागरिकाचे आयुष्य मौल्यवान असते आणि ते वाचवण्यासाठी शासकीय प्राधिकरणांनी सर्व प्रयत्न केले पाहिजेत, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने कार्यकर्त्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीचे शासकीय डॉक्टरांकडून दररोज निरीक्षण केले जावे आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्व आवश्यक ते वैद्यकीय प्रयत्न केले जावेत, असा स्पष्ट आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला दिला आहे.

पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेच्या मुद्यावरून कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होत वांगचुक २८ जूनपासून बेमुदत उपोषणावर बसले आहेत. या उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली असून त्यांचे वजन तब्बल ८.५ किलोने घटले आहे. त्यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून सक्तीने अन्न दिले जावे, अशी मागणी करणा-या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कोणत्याही नागरिकाचे आयुष्य मौल्यवान असते. वांगचुक यांच्या वैद्यकीय व शारीरिक स्थितीचे शासकीय डॉक्टरांकडून दररोज नियमितपणे निरीक्षण केले जावे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र आणि दिल्ली सरकारच्या वतीने बाजू मांडली.

वांगचुक यांची नियमीत तपासणी
वांगचुक यांच्या आरोग्याची शासकीय डॉक्टरांकडून नियमित तपासणी केली जात आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची प्रकृती अधिक खालावू नये म्हणून आवश्यक त्या सर्व वैद्यकीय उपाययोजना केल्या जातील, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात म्हटले. याचे न्यायालयाने स्वागत केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
00:30
Video thumbnail
Ramdas Athawale ON Sharad Pawar|शरद पवारांनी NDA मध्ये यावे, स्वागतच करू" – आठवले
11:50
Video thumbnail
Latur|द्रोणा डिफेन्स अकॅडमीविरोधात मनसेचे आंदोलन
03:19
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16

Latest news