अखेर सीना नदीत पाणी; भीमा-सीना जोड कालव्यातून सोडलेल्या पाण्याने सोलापूरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

रिधोरे (अतुल गवळी) : तब्बल पावणे दोन महिने पावसाने पाठ फिरवल्यानंतर अखेर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भीमा-सीना जोड कालव्यातून सोडलेले पाणी अखेर सीना नदीत दाखल झाले असून, रविवारी दुपारी हा प्रवाह रिधोरे येथील बंधाऱ्यापर्यंत पोहोचला. नदीत पाण्याचा प्रवाह दिसताच परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या हंगामात संपूर्ण जून महिना जवळपास कोरडाच गेला. जुलै महिनाही संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी ऊस, केळी, डाळिंब, मका, तूर, कांदा तसेच इतर नगदी आणि फळबाग पिकांवर पाण्याअभावी गंभीर संकट ओढवले होते. अनेक ठिकाणी पिके करपू लागल्याने शेतकरी चिंतेत होते.

शेतकऱ्यांच्या मागणीला यश
जिल्ह्यातील वाढती पाणीटंचाई आणि शेतीसमोरील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत १४ जुलै रोजी मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतली होती. या बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि शेतीसाठी पाण्याची निकड याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर जलसंपदा मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार १६ जुलैपासून उजनी धरणाच्या मुख्य डाव्या व उजव्या कालव्यांसह भीमा-सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्यात आले. या निर्णयाचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसून येत असून, कालव्यातील पाणी सीना नदीपर्यंत पोहोचले आहे.

नदीला मिळाले नवजीवन
रिधोरे येथील बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचताच परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. नदीत आलेल्या या प्रवाहामुळे विहिरी, बंधारे आणि भूजल पातळी सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वाढून पिकांना मोठा आधार मिळणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी महापूर, यंदा दुष्काळ
विशेष म्हणजे, गतवर्षी याच सीना नदीला महापूर आला होता. त्या वेळी तूर, सोयाबीन, कांदा, मका, ऊस आणि कापूस यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे उलट असून, पावसाअभावी नदी कोरडी पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले होते. अशा वेळी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी शेतकऱ्यांसाठी मोठे ‘जीवदान’ ठरत आहे.

लाखो एकर शेतीला मिळणार दिलासा
सीना नदीत दाखल झालेल्या या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील लाखो एकर शेतीला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास करपू लागलेली पिके सावरण्यास मदत होईल, तसेच खरीप हंगामातील नुकसान काही प्रमाणात टळू शकते. दरम्यान, कालव्यातून पाणी सोडल्याने तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे लक्ष अजूनही आकाशाकडे लागले आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास शेतीला नवे बळ मिळेल आणि दुष्काळसदृश परिस्थितीतून जिल्ह्याची सुटका होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news