गोल्डी ब्रार ‘एफबीआय’च्या ‘टॉप टेन मोस्ट वॉन्टेड’ यादीत

वॉशिंग्टन : अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयने (एफबीआय) कुख्यात गँगस्टर सतिंदरजित सिंग उर्फ गोल्डी ब्रारचा समावेश आपल्या टॉप-१० मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत केला आहे. त्याच्या अटकेसाठी उपयुक्त माहिती देणा-यास १० लाख डॉलर्सपर्यंतचे बक्षीस जाहीर केले आहे.

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने सोमवारी जारी केलेल्या सूचनेप्रमाणे गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई ऑर्गनाईज्ड क्राईम ग्रुपचा उत्तर अमेरिकेतील लीडर म्हणून वॉन्टेड आहे. या ग्रुपचा संबंध अमेरिका आणि कॅनडामधील अनेक हिंसक गुन्ह्यांशी जोडला गेला असून गोल्डी ब्रारच्या अटकेस मदत करणा-या, माहिती देणा-यासाठी एफबीआयने तब्बल १० लाख यूएस डॉलर्स (सुमारे ८.३ कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले.

लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध
अमेरिका आणि कॅनडामध्ये हिंसाचार पसरवणा-या लॉरेन्स बिश्नोई संघटित गुन्हेगारी टोळीशी गोल्डी ब्रारचा थेट सहभाग असल्याचा एफबीआयने आरोप केला आहे.

अत्यंत धोकादायक गुन्हेगार
एफबीआयने इशारा दिला आहे की, गोल्डी ब्रार हा सशस्त्र, अत्यंत धोकादायक आणि पळून जाण्यात सराईत आहे. त्याचा दक्षिण कॅलिफोर्निया आणि अमेरिका, कॅनडामध्ये विविध हिंसक कारवायांमध्ये कथितरित्या सहभाग आहे. एफबीआयने म्हटले आहे की, ही गुन्हेगारी टोळी राजकीय आणि धार्मिक व्यक्तींच्या हत्या, गोळीबार, अपहरण करणे, खंडणी मागणे, हल्ले करणे तसेच अमली पदार्थ व शस्त्रास्त्रांची तस्करी करणे यांसारख्या हिंसक कारवायांमध्ये सक्रियपणे सामील आहे. लॉस एंजेलिसमधील यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टाने गोल्डी ब्रारसाठी फेडरल अटक वॉरंट जारी केल्याचे देखील म्हटले गेले आहे. गोल्डी ब्रार सध्या अमेरिकेत असून तो उत्तर अमेरिकेतील टोळीच्या कारवायांवर देखरेख करत असल्याचे अमेरिकन अधिका-यांचे म्हणणे आहे. ब्रारवर खंडणी मागणे, व्यापारात अडथळा आणणे, अमली पदार्थाची तस्करी वितरणाच्या उद्देशाने कट रचणे असे अनेक गंभीर आरोप आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38
Video thumbnail
Latur Cyber Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 28 लाखांची फसवणूक; सहा आरोपी अटकेत
03:28
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
01:29
Video thumbnail
Manoj Jarange|500 कोटींच्या कथित आरोपांवरून शिंदे-फडणवीसांना जरांगेंनी घेरलं
12:51
Video thumbnail
Latur|गुंजन पाटील यांच्या हृदयस्पर्शी कवितांनी व्हिडीएफ बाजारचा समारोप.
10:05
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्हा न्यायालयाला बॉम्बची धमकी; न्यायालय परिसर रिकामा, बीडीडीएस तपासणी सुरू
01:35
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेखविरोधात पोक्सो अंतर्गत तिसरा गुन्हा दाखल; तपास एसआयटीकडे
02:43
Video thumbnail
Latur Traffic|लातूरच्या शिवाजी महाराज चौकात दीड तास वाहतूक ठप्प;शहरातील मुख्य रस्त्यावर कोंडी
02:24
Video thumbnail
Nanded|लोह्यात बजाज आणि श्रीराम फायनान्स कार्यालयांची तोडफोड; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
02:19
Video thumbnail
Latur|लातूरच्या अशोक हॉटेल चौकात झाड कोसळले; ऑटोचे नुकसान, जीवितहानी टळली
02:53
Video thumbnail
Nanded|उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते चंद्रकांत शिंदे कुटुंबाला ५ लाखांची मदत
00:41
Video thumbnail
Tuljapur|राणा जगदीशसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोनारवाडीत जनहिताचे उपक्रम
02:35

Latest news