हॅकर्सनी फ्रिजचा शस्त्रासारखा केला वापर

पॅरिस : सायबर अटॅकचा एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक असा प्रकार समोर आला आहे. यात हॅकर्सनी मोबाईल लॅपटॉप किंवा पीसी नाही तर थेट फ्रीज हॅक केला. सुपर मार्केटमधील सर्व रेफ्रिजरेशन सिस्टमच हॅक करून मोठे नुकसान करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार फ्रान्समध्ये हा सायबर अटॅक झाला असून हॅकर्सनी सुपर मार्केटमधील फ्रिज आणि फ्रिजरचे तापमान ५० डिग्रीपर्यंत वाढवून ठेवलं. त्यामुळं खाण्या पिण्याच्या अनेक गोष्टी खराब झाल्या. तसेच काही ठिकाणी आग लागण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या घटनेनंतर इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या डिवाईस किंवा मशिनच्या सायबर सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

फ्रान्समधील इंटरमोर्शे, कॅरेफोर आणि कोऑपरेटिव यू सारख्या सुपरमार्केट चेन स्टोअरवर हा हल्ला करण्यात आला. काही रिपोर्ट्सनुसार हा सायबर हल्ला शेकडो स्टोअर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या तापासात डेन्मार्कची कंपनी डॅनफोसच्या रिफ्रिजरेशन मॅनेजमेंट सिस्टमशी जोडली गेलेल्या सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटीचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र या सायबर अटॅकच्या मागे कोण होता आणि ते या सिस्टमपर्यंत तो कसा पोहचला याची माहिती समोर आलेली नाही.

कसे वाढवले तापमान?
मोठमोठ्या सुपर मार्केटमध्ये शेकडो फ्रीज आणि फ्रिजर असतात. त्यांचे तापमान कंट्रोल करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी डिजीटल कंट्रोल सिस्टमचा वापर केला जातो. या सिस्टमच्या मदतीने कर्मचारी एकाच ठिकाणावरून सर्व मशिनचे तापमान नियंत्रित करतात. गरज पडली तर त्यात बदल करू शकतात. ही व्यवस्था काम सोपे करण्यासाठी राबवली जाते. मात्र जर ही यंत्रणा सुरक्षित नसेल तर असा सायबर अटॅक होऊ शकतो. जर सायबर अटॅक करणा-यांची पोहोच सॉफ्टवेअर कंट्रोल किंवा युनिटपर्यंत निर्माण झाली तर ते मशिन अर्थात रेफ्रिजरेटर हॅक करू शकतात.

डिफ्रोस्टचा वापर
सुरूवातीच्या तपासात फोर्स्ड डिफ्रोस्ट अर्थात बर्फ वितळवणा-या फिचरचा वापर या हॅकिंगमध्ये केला गेला. फ्रिज आणि फ्रीजरच्या इव्हॅपोरेटर बर्फ वितळवण्यासाठी वापरला जातो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मात्र ही सिस्टम चुकीच्या पद्धतीनं वापरली आणि ती जास्त वेळ अ‍ॅक्टिव्ह ठेवली तर कूलिंग प्रभावित होते. रिपोर्टमध्ये काही मशिनचे तापमान हे ५० डिग्रीपर्यंत गेले होते. हे तापमान सहा तास तसेच ठेवण्यात आले होते. प्रत्येक स्टोअरमध्ये एकाच प्रकारे हल्ला केला गेला की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news