नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार!

गोरखा : नेपाळमध्ये पुन्हा एकदा भीषण महापुरामुळे हाहाकार उडाला आहे. दीड महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरातून सावरत असलेल्या नेपाळमधील गोरखा जिल्ह्यातील चुमनुब्री भागात पहाटे बुर्ही गंडक नदीला अचानक पूर आला. यामुळे पैयू आणि बगर या गावातील जवळपास ३५ घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक गावांना पुराचा फटका बसला असून वाहतुकीसाठी वापरले जाणआरे पूल आणि झुलते पूलही वाहून गेले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून काही लोकांना एअरलिफ्टही करण्यात आले आहे. गोरखाचे प्रमुख जिल्हा अधिकारी धरेन्द्र कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी मोठा पूर आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नेपाळी लष्कराचे हेलिकॉप्टर पाठविण्याची तयारी करण्यात आली. दरम्यान, नदीच्या खालच्या प्रवाहातील आणि किनारी भागांमध्ये राहणा-या नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बुर्ही गंडक नदीच्या पुरामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. आरुघाट ग्रामीण नगरपालिकेतील सोती आणि मांबू यांना जोडणारा मोटार पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. चुमनुब्री ग्रामीण नगरपालिकेतील न्याकचेत येथे न्याकचेत आणि सिर्दिबास यांना जोडणारा जुना झुलता पूलही कोसळून वाहून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याशिवाय धार्चे ग्रामीण नगरपालिकेतील माछीखोला ते केरौजा यांना जोडणारा झुलता पूलही पुराच्या तडाख्यात उद्ध्वस्त झाला. आरुघाट ग्रामीण नगरपालिका क्षेत्रातील सोती येथील लोखंडी पूलदेखील पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. या पुलांमुळे अनेक गावांचा परस्परांशी असलेला संपर्क विस्कळीत झाला असून मदतकार्य पोहोचविण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

भूस्खलनामुळे नदीचा प्रवाह अडला
चुमनुब्री ग्रामीण नगरपालिकेचे अध्यक्ष निमा लामा यांच्या माहितीनुसार, परिसरातील चुम्के खोला येथे भूस्खलन झाल्यामुळे नदीचा प्रवाह अडला होता. त्यानंतर पाण्याचा साठा वाढून अचानक पुराची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे नदीच्या आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चुमनुब्री ग्रामीण नगरपालिकेच्या उपाध्यक्षा लक्ष्मी गुरुंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोभान, घट्टेखोला, जगत आणि सल्लेरी या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. काही घरांमध्ये पाण्यासोबत चिखल आणि दगडधोंडे शिरल्याच्या बातम्याही येत आहेत. येथे बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38
Video thumbnail
Latur Cyber Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 28 लाखांची फसवणूक; सहा आरोपी अटकेत
03:28
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
01:29
Video thumbnail
Manoj Jarange|500 कोटींच्या कथित आरोपांवरून शिंदे-फडणवीसांना जरांगेंनी घेरलं
12:51
Video thumbnail
Latur|गुंजन पाटील यांच्या हृदयस्पर्शी कवितांनी व्हिडीएफ बाजारचा समारोप.
10:05
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्हा न्यायालयाला बॉम्बची धमकी; न्यायालय परिसर रिकामा, बीडीडीएस तपासणी सुरू
01:35
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेखविरोधात पोक्सो अंतर्गत तिसरा गुन्हा दाखल; तपास एसआयटीकडे
02:43
Video thumbnail
Latur Traffic|लातूरच्या शिवाजी महाराज चौकात दीड तास वाहतूक ठप्प;शहरातील मुख्य रस्त्यावर कोंडी
02:24
Video thumbnail
Nanded|लोह्यात बजाज आणि श्रीराम फायनान्स कार्यालयांची तोडफोड; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
02:19
Video thumbnail
Latur|लातूरच्या अशोक हॉटेल चौकात झाड कोसळले; ऑटोचे नुकसान, जीवितहानी टळली
02:53
Video thumbnail
Nanded|उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते चंद्रकांत शिंदे कुटुंबाला ५ लाखांची मदत
00:41
Video thumbnail
Tuljapur|राणा जगदीशसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोनारवाडीत जनहिताचे उपक्रम
02:35

Latest news