41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रआयपीएस सदानंद दाते एनआयएचे नवे महासंचालक

आयपीएस सदानंद दाते एनआयएचे नवे महासंचालक

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेचे डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर, पीयूष आनंद यांची राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून बुधवार, २७ मार्च रोजी या नियुक्त्यांबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. आयपीएस राजीव कुमार शर्मा यांना ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये ऊॠ म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. मराठमोळ्या अधिका-याच्या हाती आता संपूर्ण ठकअची सूत्रे असणार आहेत. दाते यांना २०१५ मध्ये सीआरपीएफच्या डीजीपदी नियुक्त करण्यात आले होते. हा तो काळ होता जेव्हा छत्तीसगडसह देशातील अनेक भागांत नक्षलवादी कारवायांनी डोके वर काढले होते. त्यानंतर सशस्त्र अभियान राबवण्यात आले होते.

सदानंद दाते हे १९९० बॅचच्या महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते छत्तीसगडच्या गडचिरोलीमध्ये नक्षली मोर्चाच्या काळातही तैनात होते. तर, फेब्रुवारीमध्ये सीआरपीएफमध्ये त्यांना आयजीपदी बढती मिळाली होती. त्यांना सीआरपीएफचे स्पेशल आयजी बनवले होते. त्यानंतर डीजी म्हणून ते सीआरपीएफमध्ये पाच वर्षे नियुक्त होते. आता त्यांच्या हाती एनआयएची धुरा सोपवण्यात आली आहे.

२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री मुंबई शहरावर १० दहशतवाद्यांनी हल्ला केला. मुंबईवर झालेला हा आजवरचा सर्वांत भीषण हल्ला होता. आयपीएस सदानंद दाते यांनीही आपल्या जिवाची बाजी लावत दहशतवाद्यांना रोखण्याचे काम केले होते. हल्ला झाल्यानंतर व दहशतवाद्यांना टार्गेट केलेल्या जागेवर सर्वांत प्रथम दाते पोहोचले होते व शेवटपर्यंत ते या कारवाया रोखण्यासाठी झगडत होते. सीएसटी येथील कामा आणि एल्बलेस रुग्णालयात ते दहशतवाद्यांशी लढत होते. या हल्ल्यात ते गंभीर जखमीदेखील झाले होते.

सदानंद दाते यांचा २६/११ हल्ल्यात त्यांनी दाखवलेल्या साहसामुळे सन्मानदेखील केला होता. दाते यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR