40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडगुराच्या गोठ्याला आग

गुराच्या गोठ्याला आग

 चारा, खाद्यपदार्थ, पत्राचे टिन जळून खाक

मुखेड / प्रतिनिधी

मुखेड शहरातील विद्यानगर परिसरातील एका गुराच्या गोठ्याला अचानक आग लागल्यामुळे आगीने रोद्ररूप धारण केले. तेव्हा आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या धाडसेने ही आग आटोक्यात आणली यानंतर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीने उर्वरित आग विझवली. नागरिक व अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे कुठलीही हानी झाली नाही.

मुखेड शहरात वाढत्या तापमानामुळे आगीच्या घटना घडत आहेत. मुखेड शहरातील विद्यानगर परिसरात एका गुराच्या गोठ्याला अचानक आग लागली यात सुदैवाने जनावरे गोठ्यामध्ये नव्हती मात्र गुरांसाठी ठेवलेल्या मोठ्या प्रमाणावरील गुरांचा चारा व इतर गुरांचे खाद्यपदार्थ तसेच उभारलेला गोठ्याचे लाकडे व पत्राचे टिन जळून खाक झाले. नरसिंग कोरे,विनायक संगेवार, कृष्णा संगेवार,सुशील कोरे, ग्रामसेवक प्रवीण बारमाळे, शिवसांब स्वामी, बल्लारसू, वानखेडे गुरुजी यांनी परिश्रम घेऊन सदर आग आटोक्यात आणली.

यासाठी गल्लीतील महिलांनीही मोठा हातभार लावला यानंतर आलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनाने उर्वरित आग विझवली.आगीमुळे गुरांचे गोठ्याचे,वस्तुचे,चा-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे प्रशासनाने याची दखल घेवुन नुकसानग्रस्त नागरिकास नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकातुन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR