38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरआजारी जरांगे पाटलांची जलील यांनी घेतली भेट

आजारी जरांगे पाटलांची जलील यांनी घेतली भेट

छ. संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार न देता ज्यांनी आपल्याला साथ दिली नाही त्यांना पाडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले होते. मराठवाड्यात मतदान शुक्रवारी (ता.२६) पार पडले. या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरल्याचे मतदानानंतरच्या चर्चेतून समोर येत आहे. जरांगे पाटील हे संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळणताच संभाजीनगरचे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी जरांगे यांची भेट घेतली.

अशक्तपणामुळे थकवा आलेल्या जरांगे पाटील यांच्यावर संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच शनिवारी इम्तियाज जलील यांनी त्यांची भेट घेत लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. इम्तियाज जलील यांनी जरांगे पाटील यांची घेतलेली भेट महत्वाची समजली जाते.

इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले तेव्हा इम्तियाज यांनी त्यांची भेट घेतली होती. आमचा मोठा भाऊ असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर लहान भाऊ म्हणून मुस्लिम समाज आरक्षणासाठी आणखी वाट पाहण्यास तयार असल्याची भूमिका इम्तियाज यांनी अंतरवाली सराटी येथील व्यासपीठावरून जाहीर केली होती. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका राज्यात महत्त्वाची ठरत आहे. मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारने फसवल्याची भावना आहे. याचे पडसाद निवडणूक प्रचारा दरम्यान उमटल्याचे दिसले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR