28.6 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसोलापूरसोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीकरिता सोमवारी मतदान

सोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीकरिता सोमवारी मतदान

सोलापूर : सोलापूर वकील संघाची अध्यक्ष, उपाध्यक्ष. सचिव, सहसचिव व खजिनदार या पाच पदाच्या निवडीसाठी सोमवारी स.८ ते सायं. ७ या वेळेत मतदान होत आहे, त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या व्यवस्थापनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. सोलापूर विधीज्ञ संघाची निवडणूक दरवर्षी होत असते यंदाच्या निवडणुकीला थोडे वेगळेच महत्त्व प्राप्त होत आहे. अळंगे, फताटे व उजळंबे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. शिवाय देशभरात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच सोलापूर वकील संघाची देखील निवडणूक होत आहे.

यंदा निवडणुकीत १८३१ वकिल आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही वाढती मतदार संख्या विचारात घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी ॲड सुरेश गायकवाड व त्यांच्या सर्व टीमने निवडणूक प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी काळजी घेतली आहे. यंदा मतदाना करिता १० मतदान कक्ष करण्यात आले आहेत. याशिवाय जेष्ठ व महिला वकील यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे. मतदारांची एकाच वेळी गर्दी होऊ नये, यातून होणारे वाद विवाद टाळून शांततेत मतदान व्हावे यासाठी पुरेशी यंत्रणा उभी केली आहे‌ ही मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १८ वकिलांची टीम करण्यात आली आहे.

सर्व मतदार वकिल सदस्यानी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून शांततेत मतदान करावे व वकिल संघातील लोकशाही जिवंत असल्याचे दाखवून द्यावे असे आवहान विद्यमान अध्यक्ष तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश गायकवाड यांनी केले आहे‌ त्यांना ॲड .व्ही.सी. दरगड, ॲड. अविनाश काळे ॲड. अनिता रणशृंगारे , ॲड. अविनाश बिराजदार, ॲड. दादा जाधव , ॲड. युवराज अवताडे ॲड. सुनील शिरसागर ॲड. मोहन कुरापाटी, ॲड .रफिक शेख, ॲड. सहदेव भडकुंबे यांचे सहकार्य लाभत आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR