30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी शहरात विविध ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी शहरात विविध ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था

सोलापूर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी (दि.२९) सकाळी ११ वाजता होम मैदान येथे होणा-या जाहीर सभेसाठी शहरात विविध ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी येणा-या नागरिकांनी या ठिकाणी दुचाकी आणि चार चाकी वाहने लावावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

या सभेसाठी नागरिकांना होम मैदानामध्ये मार्केट पोलिस चौकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथूनच प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवेढा व पंढरपूरकडून तसेच जुना पुणे नाका, तुळजापूर रोडकडून वाहनातून येणा-या नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी नागरिकांना उतरवून त्यांची वाहने जुनी मिल कंपाऊंड व मरीआई चौक येथील एक्जीबिशन ग्राउंड येथे लावावीत.

अक्कलकोटकडून येणारी वाहने नागरिकांना सिव्हील चौक येथे नागरिकांना उतरवून पुंजाल मैदान किंवा नुमवि प्रशाला पाठीमागील मुलांचे शासकीय वस्तीगृह मैदान येथे वाहने लावावीत. होटगी रोड करून येणारी वाहने विजापूर रोड, पत्रकार भवन मोदी पोलीस चौकीमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नागरिकांना उतरवून संगमेश्वर महाविद्यालयाजवळील स्काऊट गाईड मैदान किंवा नुमवि प्रशाला पाठीमागील मुलांचे शासकीय वस्तीगृह मैदान येथे वाहने लावावीत. तसेच नॉर्थकोट मैदान व हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुचाकी वाहने लावता येतील, असे प्रशासनाने कळवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR