38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगपुणे-नाशिक रेल्वे मार्गाने जोडली जाणार!

पुणे-नाशिक रेल्वे मार्गाने जोडली जाणार!

नाशिक : पुणे आणि नाशिक ही दोन महत्वाची शहरे अजूनही रेल्वेने जोडली गेली नाहीत. या शहरांना रेल्वेने जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महारेलकडून या मार्गावर सेमीहायस्पीड ट्रेनचे काम सुरु केले. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. आता नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी २५०० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे नाशिक -पुणे रेल्वे मार्ग उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मध्य रेल्वे बोर्डाकडे दिला होता. परंतु त्यात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटींचे निवारण करण्यात आले. त्यानंतर पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा अंतिम आराखडा तयार झाला. आता या मार्गासाठी निधीची सर्वात मोठी अडचण होती. नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी २५०० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. रेल्वे मंडळाकडून निधीला मान्यता मिळाली. ६० टक्के इक्विटीतून हा निधी मिळणार आहे. यामुळे आता नाशिक-पुणे रेल्वे मार्ग उभारणीचा मार्ग मोकळा झाला.

२३५ किलोमीटरचा रेल्वे मार्ग
नाशिक-पुणे रेल्वेसाठी केंद्र आणि राज्य शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. दोन शहरांना जोडणारा २३५ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे. या मार्गावरुन सेमी हायस्पीड रेल्वे जाणार आहे. हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी महारेलला देण्यात आली. या रेल्वे मार्गासाठी रेल्वे रुळ टाकणे आणि रेल्वे स्टेशन उभारण्यासाठी जमीन संपादन करण्याचे काम सुरु केले आहे. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

१ तास ४५ मिनिटांचा प्रवास
नाशिक पुणे रेल्वे मार्ग २३५ किलोमीटर आहे. या मार्गावर १८ बोगदे असणार आहे. तसेच १९ उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे. २०० किलोमीटर प्रतितास वेगाने सेमीहायस्पीड रेल्वे या मार्गावरुन धावणार आहे. हा मार्ग सुरुवातीपासून संपूर्ण विद्युतीकरण झालेला असणार आहे. या मार्गावरुन पहिल्या टप्प्यात ६ कोचची रेल्वे धावणार आहे. त्यानंतर १२ ते १६ कोचची रेल्वे धावणार आहे. मार्गावर एकूण २० स्टेशन असणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर पुणे-नाशिक पाच ते सहा तासांचा प्रवास अवघ्या १ तास ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR