रशियाची नाटो देशांना अणुहल्ल्याची धमकी

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी नाटो देशांना अणुहल्ल्याची धमकी दिली. त्यांनी म्हटले की, रशियाच्या कोणत्याही भूभागावर हल्ला झाल्यास रशिया आपल्या सर्व शस्त्रांनी प्रत्युत्तर देईल.

पुतीन यांनी मॉस्को येथे झालेल्या वाल्दाई फोरमदरम्यान म्हटले की नाटोने कॅलिनिनग्राडला रशियापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला, तर रशिया तातडीने प्रत्युत्तर देईल. कॅलिनिनग्राड हा रशियाचा एक स्वतंत्र भूभाग आहे. तो रशियाच्या उर्वरित भागाशी जोडलेला नाही. रशियाच्या सीमारेषेपासून ३०० किमी अंतरावर युरोपमध्ये पोलंड आणि लिथुआनियादरम्यान तो स्थित आहे. दुस-या महायुद्धानंतर १९४५ पासून या भागावर रशियाचा ताबा आहे.

युरोपमधील रशियाच्या अनेक दूतावासांनी या आठवड्यात निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, मॉस्कोकडे अशी माहिती आहे की नाटो कॅलिनिनग्राड आणि संपूर्ण परिसराची हवाई तसेच नौदल नाकेबंदी करण्याच्या तयारीत आहे. रशियाने युरोपीय नेत्यांवर धोकादायक खेळ खेळत असल्याचा आरोप केला. रशियाचे म्हणणे आहे की, युरोपीय नेते सातत्याने असा दावा करत आहेत की मॉस्को दुस-या देशावर हल्ला करू शकतो किंवा ड्रोन आणि तोडफोडीच्या माध्यमातून इतर देशांमध्ये अस्थिरता निर्माण करू शकतो. रशियाने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

बाल्टिक समुद्रापर्यंत प्रवेश
येथे रशियाचा बाल्टिक ताफा तैनात आहे, ज्यामुळे रशियाला या परिसरात सागरी लष्करी उपस्थिती कायम ठेवण्यास मदत मिळते.

नाटोच्या मधोमध धोरणात्मक स्थान
हे चारही बाजूंनी नाटो देशांच्या जवळ आहे. त्यामुळे युरोपमध्ये लष्करी दबाव कायम ठेवण्याच्या दृष्टीने हे रशियासाठी महत्त्वाचे आहे.

क्षेपणास्त्र तैनाती
येथे रशियाने अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेली इस्कंदर क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे. याशिवाय येथे अनेक आधुनिक शस्त्रेही आहेत.

लष्करी निगराणी
येथून पोलंड, लिथुआनिया आणि बाल्टिक समुद्राच्या आसपासच्या भागांवर लक्ष ठेवणे सोपे आहे.

रशियासाठी सुरक्षा कवच
रशियाचे मत आहे की कॅलिनिनग्राड त्याच्या पश्चिम सीमेच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतो.

पाश्चिमात्य देशांची रशियासोबत युद्धाची तयारी
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाश्चिमात्य देश आणि युरोपवर तणाव वाढवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, पाश्चिमात्य देश येत्या काही वर्षांत रशियासोबत युद्धाची तयारी करत असल्याचे सांगत आहेत. त्यांनी बाल्टिक समुद्रातील लष्करी सराव आणि रशियन जहाजे जप्त करण्याचाही उल्लेख केला. त्यांचे हे वक्तव्य मॉस्कोने दिलेल्या त्या इशा-यानंतर आले आहे, ज्यात नाटोला सांगण्यात आले होते की कॅलिनिनग्राडच्या संरक्षणासाठी रशिया अण्वस्त्रे वापरण्यापासून मागे हटणार नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38
Video thumbnail
Latur Cyber Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 28 लाखांची फसवणूक; सहा आरोपी अटकेत
03:28
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
01:29
Video thumbnail
Manoj Jarange|500 कोटींच्या कथित आरोपांवरून शिंदे-फडणवीसांना जरांगेंनी घेरलं
12:51
Video thumbnail
Latur|गुंजन पाटील यांच्या हृदयस्पर्शी कवितांनी व्हिडीएफ बाजारचा समारोप.
10:05
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्हा न्यायालयाला बॉम्बची धमकी; न्यायालय परिसर रिकामा, बीडीडीएस तपासणी सुरू
01:35
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेखविरोधात पोक्सो अंतर्गत तिसरा गुन्हा दाखल; तपास एसआयटीकडे
02:43
Video thumbnail
Latur Traffic|लातूरच्या शिवाजी महाराज चौकात दीड तास वाहतूक ठप्प;शहरातील मुख्य रस्त्यावर कोंडी
02:24
Video thumbnail
Nanded|लोह्यात बजाज आणि श्रीराम फायनान्स कार्यालयांची तोडफोड; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
02:19
Video thumbnail
Latur|लातूरच्या अशोक हॉटेल चौकात झाड कोसळले; ऑटोचे नुकसान, जीवितहानी टळली
02:53
Video thumbnail
Nanded|उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते चंद्रकांत शिंदे कुटुंबाला ५ लाखांची मदत
00:41
Video thumbnail
Tuljapur|राणा जगदीशसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोनारवाडीत जनहिताचे उपक्रम
02:35

Latest news