38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनदिवंगत अभिनेता सतीश कौशिकच्या आठवणीने सलमान झाला भावूक

दिवंगत अभिनेता सतीश कौशिकच्या आठवणीने सलमान झाला भावूक

मुंबई : अरबाज खानचा ‘पटना शुक्ला’ चित्रपट आज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी या चित्रपटाची स्क्रीनिंग पार पडली. या स्क्रीनिंगला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसह सुपरस्टार सलमान खानने हजेरी लावली. या चित्रपटात दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांनीही काम केले आहे. सतीश कौशिकचा हा शेवटचा चित्रपट असल्याचेही बोलले जात आहे. सलमान खान आणि सतीश कौशिक यांनीही अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. मात्र, ‘पटना शुक्ला’च्या स्क्रीनिंगदरम्यान, सलमानला सतीश कौशिकची आठवण झाली यामुळे तो चांगलाच भावूक झाला.

‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगचा एक व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये सलमान सतीश कौशिकबद्दल बोलताना भावूक होताना दिसत आहे. सलमान म्हणाला की, सतीशजी अजूनही आमच्यासोबत आहेत. सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी मृत्यूपूर्वी आपला प्रत्येक प्रोजेक्ट पूर्ण केला होता. ‘किसी का भाई किसी की जान’मध्येही तो होता. त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी, सतीश कौशिक यांनी ‘पटना शुक्ला’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते, असे सलमान म्हणाला. ‘पटना शुक्ला’ चित्रपट पूर्ण झाल्याची घोषणा करत सतीश कौशिकनी सलमान, अरबाज आणि सोहेल खानसोबत एक सामूहिक फोटो शूट केला होता आणि त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला होता.

या चित्रपटात अरबाज खानसह रवीना टंडन मुख्य भूमिकेत आहे. तर सतीश कौशिकनी या चित्रपटात एका न्यायाधीशाची भूमिका केली आहे. रवीना सतीश कौशिक यांच्या न्यायालयात एक खटला लढते. ‘पटना शुक्ला’ आज शुक्रवार, २९ मार्च रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान सतीश कौशिक अभिनेत्री कंगना राणावतसोबत ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातही दिसणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR