34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeअंतरराष्ट्रीयएकाच वेळी दिला सहा बाळांना जन्म

एकाच वेळी दिला सहा बाळांना जन्म

इस्लामाबाद : पाकिस्तानात रावळपिंडीत एका महिलेने एकाच वेळी सहा बाळांना जन्म दिला आहे. हे ‘सेक्स्टुपलेट्स’ म्हणजेच ‘षष्ठाळे’ आणि त्यांची आई ठणठणीत आहे. पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्राच्या माहितीनुसार हजारा कॉलनीत राहणा-­या मोहम्मद वहिद यांच्या २७ वर्षांच्या झीनत नावाच्या पत्नीने या बाळांना जन्म दिला.

प्रसूतीवेदना सुरू झाल्यावर गुरुवारी या महिलेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी तिने तासाभरात एका पाठोपाठ एक अशा सहा बाळांना जन्म दिला. जिल्हा रुग्णालयाच्या मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. फरजाना यांनी सांगितले की, या सहा बाळांमध्ये चार मुले असून, दोन मुली आहेत. या सर्व सहा बाळांचे वजन दोन पौंडपेक्षा कमी आहे. मात्र, सध्या त्यांची आणि आईची तब्येत ठीक आहे.

डॉक्टरांनी या बाळांना इनक्युबेटरमध्ये ठेवले आहे. त्यांना विशेष धोका नाही असे सांगण्यात आले. झीनतची ही पहिलीच प्रसूती होती. या पहिल्याच प्रसूतीवेळी तिने सहा बाळांना जन्म दिला. प्रसूतीमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते हे लक्षात आल्यावर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम बनवण्यात आली होती. तिच्या पतीने एकाच वेळी इतक्या अपत्यांचा बाप बनल्याने आनंद व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR