34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबोट बुडाल्याने ५० पेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू

बोट बुडाल्याने ५० पेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू

मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट नदीत बुडाल्याने किमान ५० जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी नुकतीच ही माहिती दिली.

सुमारे ३०० लोकांना घेऊन जाणारी लाकडी बोट राजधानी बांगुईमधून जाणारी मापोको नदी ओलांडत होती तेव्हा हा अपघात झाला. स्थानिक मच्छिमारांनी सर्वप्रथम बचावकार्य सुरू केले.

बचाव कार्यात सहभागी मच्छिमार एड्रियन मोसामो यांनी सांगितले की, लष्कर पोहोचेपर्यंत किमान २० मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. लष्कराच्या शोध मोहिमेचा विस्तार होत असल्याने मृतांची संख्या वाढत असल्याचे बांगुई विद्यापीठ रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR