40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयइराणचा इस्रायलवर ड्रोन हल्ला

इराणचा इस्रायलवर ड्रोन हल्ला

नवी दिल्ली : इराणच्या लष्कराने १५० ते २०० ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर जोरदार हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायली लष्कराने शनिवारी रात्री उशिरा या हल्ल्याची माहिती दिली. तर अमेरिकन लष्कराने इराणचे काही ड्रोन सीरिया आणि र्जाडनमध्ये पाडले असल्याचेही सांगण्यात येत आहे. या हल्लयात इस्रायलच्या लष्करी तळाचे नुकसान झाल्याचेही सांगण्यात येत आहे. इराणने या कारवाईला ‘ऑपरेशन टू प्रामिस’ असे नाव दिले आहे.

दरम्यान, इस्रायली लष्कराने सांगितले की, आम्ही इराणमध्ये काही ड्रोन उडताना पाहिले असून, त्यांना इस्रायमध्ये येण्यासाठी काही तास लागतील असे लष्कराने म्हटले आहे. तर दुसरीकडे इराणने या युध्दापासनू अमेरिकेला दुर राहण्याचा सल्ला दिल्ला आहे. १ एप्रिल रोजी इस्रायलने सीरियातील इराणी दूतावासावर हवाई हल्ला केला होता. यामध्ये इराणच्या दोन सर्वोच्च लष्करी कमांडरसह १३ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर इराणने बदला म्हणून इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली होती, ती धमकी इराण प्रत्येक्षात उतरवताना दिसत आहे.

दरम्यान, इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील भारतीय दूतावासाने इस्रायलमध्ये राहणा-या सर्व भारतीय नागरिकांना शांतता राखण्यास आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.दूतावासाने सांगितले की, आम्ही या घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहोत. आमचे अधिकारी इराणी अधिकारी आणि भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत. त्यांची सुरक्षा ही आमच्यासाठी महत्वाची असल्याचे दूतावासाने म्हटले असून भारतीयांसाठी दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक आणि ईमेल आयडीही जारी केला आहे. तर एअर इंडियाने शनिवारीच खबरदारी म्हणून इराणच्या हवाई मार्गोतून जाणे बंद केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR