रेल्वेचा अजब कारभार! मलिकपेठ स्थानकावर प्रवाशांना उभ्या रेल्वेखालून सरपटत जाण्याचा स्टेशन मास्तरांचा सल्ला

मोहोळ (रजनीश कसबे) : रेल्वे प्रशासनाचा अनागोंदी कारभार आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल असलेली कमालीची अनास्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ रेल्वे स्थानकावर प्रवाशांना चक्क उभ्या असलेल्या रेल्वे गाड्यांच्या खालून सरपटत जाऊन आपली ट्रेन पकडावी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, खुद्द स्टेशन मास्तरांनीच प्रवाशांना असा जीवघेणा सल्ला दिल्याने संतापाची लाट उसळली आहे.

सोलापूर-पुणे पॅसेंजरने प्रवास करण्यासाठी अनेक प्रवासी रात्री १ च्या सुमारास मलिकपेठ स्थानकावर जमले होते. या स्थानकावर एकूण तीन रेल्वे मार्ग (पटरी) आहेत. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर आधीच दोन मालगाड्या किंवा इतर गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. नियमानुसार पॅसेंजर गाडी प्लॅटफॉर्मला लागणे अपेक्षित असताना, रेल्वे प्रशासनाने ती गाडी मधल्या राखीव रुळावर (मिडल लाईन) उभी केली.

दोन्ही बाजूला गाड्या उभ्या असल्यामुळे प्रवाशांना मधल्या रुळावर असलेल्या पॅसेंजरपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग उरला नव्हता. यावेळी संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडे दाद मागितली असता, त्यांनी प्रवाशांना चक्क “उभ्या असलेल्या गाडीच्या डब्याखालून पलीकडे जा आणि गाडीत बसा” असे बेजबाबदार उत्तर दिले.

स्थानकावर पादचारी पूल (FOB) उपलब्ध आहे, मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला गेल्या दोन-तीन दिवसांपासून रेल्वे गाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना पुलाचा वापर करूनही थेट प्लॅटफॉर्मवर उतरता येत नव्हते. अखेर नाईलाजास्तव लहान मुले, महिला आणि वृद्धांना रात्रीच्या अंधारात उभ्या असलेल्या रेल्वेच्या चाकांमधून आणि डब्याखालून सरपटत जीव धोक्यात घालून पॅसेंजर गाठावी लागली.

हा प्रकार मलिकपेठ स्थानकावर नवीन नसून वारंवार अशा घटना घडत असल्याचे स्थानिक प्रवाशांनी सांगितले आहे. रेल्वे प्रशासनाच्या या ‘अजब’ नियोजनामुळे एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात आहे.

“रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या जिवाची काहीच किंमत उरलेली नाही का? स्टेशन मास्तरांनी डब्याखालून जाण्यास सांगणे हे अत्यंत संतापजनक आहे. जर त्याच वेळी उभी असलेली गाडी अचानक सुरू झाली असती, तर होणाऱ्या भीषण अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार राहिले असते का?”
— संतप्त प्रवासी, मलिकपेठ

प्रशासनाने वेळीच दखल घेऊन हा प्रकार थांबवावा आणि प्रवाशांना सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवरून गाडीत चढता येईल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news