राज्यावर तिहेरी संकट

मुंबई/पुणे : सध्या संपूर्ण महाराष्ट्र कडक उन्हाच्या झळा सोसत असतानाच, राज्यावर विशेषत: मराठवाडा आणि इतर ग्रामीण भागांवर तिहेरी संकट कोसळले आहे. एकीकडे तीव्र पाणीटंचाई, दुसरीकडे शेतीकामाच्या ऐन हंगामात निर्माण झालेला डिझेल तुटवडा आणि त्यातच भर घालणारे अघोषित लोडशेडिंग यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या तिहेरी संकटामुळे बळिराजा संकटात सापडला आहे.

पाणी, वीज आणि इंधन या तीनही जीवनावश्यक घटकांसाठी ग्रामीण भागाला सध्या संघर्ष करावा लागत आहे. सरकारने या तिहेरी संकटाची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा आणि अघोषित लोडशेडिंग त्वरित थांबवून शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी आता ग्रामीण भागातून होत आहे.

मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना सध्या वेग आला आहे. मात्र, ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. शेतकरी आपल्या ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांसाठी डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगा लावून उभे आहेत. अनेक तास प्रतीक्षा करूनही शेतक-यांना शेतीच्या कामासाठी कॅनभर डिझेल देखील मिळणे कठीण झाले आहे. डिझेलअभावी ट्रॅक्टर जागच्या जागी उभे असल्याने शेतीची मशागत आणि पेरणीपूर्व कामे पूर्णपणे खोळंबली आहेत.

पाण्यासाठी वणवण
यंदा उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून ग्रामीण भागात जलसाठे तळ गाठू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. महिला आणि बालकांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायी भटकंती करावी लागत आहे. अनेक गावांमध्ये विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्याने पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

अघोषित लोडशेडिंग
वीज वितरण कंपनीच्या अघोषित लोडशेडिंगने ग्रामीण भागातील अडचणींमध्ये आणखी भर घातली आहे. विहिरीत पाणी आहे, पण वीज नाही, वीज आली तर डिझेल नाही, अशी विदारक स्थिती सध्या शेतक-यांची झाली आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विहिरीतील किंवा विंधन विहिरीतील पाणी पिकांना कसे द्यायचे, असा गंभीर प्रश्न शेतक-यांसमोर निर्माण झाला आहे.

बळिराजा संकटात
कडक उन्हामुळे तापमान ४० अंशाच्या पार गेले आहे. अशा परिस्थितीत पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास हातात आलेली पिके डोळ्यादेखत करपून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातुरातील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातील नामांकित डॉक्टरची CBI कडून चौकशी सुरू
02:22
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातूरमधील औसा रोड परिसरातील नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर?
01:52
Video thumbnail
Latur|खंडापूर पादुका दर्शन अपहार प्रकरण; किशोर महाराजांच्या प्रतिमेला जोड्याचा हार, धरणे आंदोलन सुरु
04:10
Video thumbnail
शिव ठाकरेच्या अमरावतीतील घरी फराह खान यांची सरप्राईज भेट; शिवच्या आजीच्या हातच्या भाकरीवर मारला ताव
00:31
Video thumbnail
लातूरमध्ये खुराणा ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप!
00:35
Video thumbnail
लातूर पॅटर्नचे यश, आव्हाने आणि भविष्य; पहा काय म्हणाले डॉ.सोमनाथ रोडे!
24:00
Video thumbnail
हिंगोलीत डिझेल टंचाईचे संकट! शेतीच्या कामासाठी पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा
03:11
Video thumbnail
NEET पेपर फुटी प्रकरण: डॉ. मनोज शिरुरेंच्या पत्नीची CBI कडून कसून चौकशी; धक्कादायक माहिती समोर
03:11
Video thumbnail
उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
09:33
Video thumbnail
लातुरात डॉ. मनोज शिरुरेंच्या नातेवाईकांवर CBI चा छापा; दोन तास चौकशी, मोठी रोकड जप्त!
03:00
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16

Latest news