धर्मशाला : वृत्तसंस्था
अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा सहज पाठलाग करत टीम इंडियाने पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात विजयी सलामी दिली. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २४.५ षटकात सर्वबाद १९४ धावा केल्या. भारताने हे आव्हान २२.५ षटकांत पूर्ण केले. गिलने कॅप्टन इनिंग करताना ६६ चेंडूत नाबाद ६६ धावा केल्या. केएल राहुलने १९ चेंडूत ३९ धावा करत विजय आणखी सोपा केला.
तत्पूर्वी डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. दुखापतीतून सावरून संघात परतलेला रोहित शर्मा अवघ्या १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि गिलने दुस-या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. इशान २२ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरही स्वस्तात १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल आणि गिल यांनी विजय साकार केला. टीम इंडियाकडून पदार्पण केलेल्या हर्ष दुबे आणि गुरनुर ब्रार यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेत चमकदार कामगिरी केली. दरम्यान, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या अफगाण संघाची सुरुवात खराब झाली. परंतु रहमानुल्ला गुरबाजने २५ चेंडूंत अर्धशतक आणि अवघ्या ४८ चेंडूंमध्ये शतक आणि ५१ चेंडूंत ८ षटकार आणि ८ चौकारांसह १०२ धावा केल्याने भारतासमोर मोठे आव्हान उभारता आले.
















