कंत्राटदार अत्महात्या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

उदगीर : प्रतिनिधी
गुत्तेदाराने गळफास घेऊन केलेल्या आत्महत्या प्रकरणी ११ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दयानंद बाबूराव हुल्ले (वय ५०, रा. वायगाव, ता. उदगीर, ह.मु. लातूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा आदित्य हुल्ले यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तालुक्यातील वायगाव येथे ५० वर्षीय गुत्तेदार दयानंद हुल्ले यांनी वायगाव येथील राहत्या घरातील खोलीच्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली होती. दयानंद हुल्ले यांनी काही व्यक्तींना पैसे दिले होते. हे पैसे परत मिळावेत म्हणून त्यांनी संबंधितांकडे वारंवार मागणी केली मात्र पैसे परत न करता संबंधितांनी त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली होती. दयानंद हुल्ले यांनी आत्महत्येपूर्वी त्रास देणा-या व्यक्तींची नावे डायरीत लिहून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणास आता गुन्ह्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ३१ ऑगस्ट रोजी फिर्यादीने पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आसीफ काझी, किरण पायाळ, निखिल जांभळे, लोंढे, घनश्याम मोरे, मीना, विनय जाकते, हरिभाऊ भगत, गणेश हॉटेलचे मालक, केंद्रे इंजिनियर आणि रहिम भाई अशा ११ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news