लातूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जय मल्हार ग्रप, सेलूच्या वतीने ‘लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जाज्वल्य इतिहास’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा नारीरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
याच कार्यक्रमात श्री गणेश विद्यालय सेलू येथील १० वीच्या परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्या व वक्त्या रंजना हासुरे, जिजाऊ ब्रिगेडच्या लातूर जिल्हाध्यक्ष अर्चनाताई पाटील, जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष नितीन बंडगर, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी मीराताई देशमुख, लता बावणे, जयश्री सावंत, सुवर्ण पाटील, हिरा हेडगे, श्रीमती निलंगेकर, राहुल गाडे, सेलू गावच्या सरपंच कविताताई कदम, उपसरपंच प्रा. शिवाजी पाटील, गुणवंत पाटील, खंडेराव लांडगे, बालाजी चामे, लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
















