दुष्काळ दारात… आता मृत्यूही दारातच 

लातूर : एजाज शेख
जिल्ह्यातील दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि मायक्रोफायनान्स कंपन्यांचे कर्ज संकट हा सध्या अत्यंत गंभीर विषय बनला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागांत ‘एल निनो’च्या प्रभावामुळे भीषण कोरडा दुष्काळ पडला असून खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत खासगी मायक्रोफायनान्स आणि फायनान्स कंपन्यांकडून होणा-या सक्तीच्या कर्जवसुलीमुळे शेतक-यांवरील तसेच कर्ज घेतलेल्या सामान्य माणसांवरील मानसिक ताण प्रचंड वाढला आहे, ज्यातून आत्महत्येच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. सावकाराच्या तगाद्यामुळे एका सामान्य कर्जदाराने स्वत:च्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची विदारक घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री लातूर शहरातील अवंतीनगरमध्ये घडली. ही घटना पाहता दुष्काळच दारात आला नाही तर मृत्यूही दारात आल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
गळफास घेणा-या व्यक्तीने खाजगी सावकाराकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड वेळेवर न झाल्याने खाजगी सावकाराने कर्जदाराच्या घरी जाऊन चारचौघांसमोर कर्जदाराच्या पत्नीस अश्लील शिवीगाळ केली. हा अपमान सहन न झाल्याने सौदागर कदम यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे यंत्रणेचा ढिसाळपणा पुन्हा उघडा पडला आहे. महाराष्ट्रात अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४’ लागू करण्यात आला आहे. या परवान्याशिवाय सावकारी करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. हा कायदासुद्धा कागदावरच  आहे. लातूर जिल्ह्यात परवानाधारक फायनान्स व मनिलेंडर्स सावकारांची संख्या लक्षणिय आहे. ३०४ फायनान्सचे नूतणीकरण झाले आहे. ६८ नवीन परवानाधारक फायनान्स व मनिलेंडर्स आहेत. ३३ फायनान्स आणि ३३९ मनिलेंडर्स आहेत. तसेच अवैधरित्या सावकारी करणा-यांची संख्या खुप मोठी आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. खरे तर परवानाधारक आणि अवैधरित्या सावकारी करणा-यांना ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४’नूसार नोटीसा बजावून त्यांना समज देण्याची गरज आहे.
जिल्हाधिका-यांच्या सूचना कागदावरच 
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व अन्य कर्जदारांना दिलेल्या कर्जाची वसुली करताना स्मॉल फायनान्स, मायक्रोफायनान्स व इतर खासगी वित्तीय संस्थांनी कोणत्याही प्रकारची सक्ती, धमकी किंवा बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नये. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. जे कर्जदार एकरकमी परतफेड करण्यास इच्छुक असतील, त्यांचे अर्ज स्वीकारून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्येही यासंदर्भातील वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी वित्तीय संस्थांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. या बाबतीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी आवश्यक समन्वय साधावा, स्मॉल फायनान्स, मायक्रोफायनान्स व इतर वित्तीय संस्थांकडून कर्जवसुलीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनामार्फत संबंधितांवर कायद्यानुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. क्षेत्रीय स्तरावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी स्मॉल फायनान्स, मायक्रोफायनान्स व इतर वित्तीय संस्थांच्या कर्जवसुलीच्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावे. अनधिकृत वसुली, कर्जदारांना धमकावणे आणि इतर संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्यांची तातडीने पडताळणी करून संबंधित कायद्यांनुसार आवश्यक ती कारवाई करावी. तसेच अशा प्रकरणांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या होत्या.  परंतु, जिल्हाधिका-यांच्या या सूचना कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोट प्रकरणात बंदूक घर मालकाला अटक | दोन कुरियर चालक आरोपी
02:25
Video thumbnail
Latur News|गांधी चौक पोलिसांनी शोधले १४ हरवलेले मोबाईल | CEIR पोर्टलची मदत
02:23
Video thumbnail
Latur News : मालमत्ता कर थकबाकीदारांवर मनपाची कडक कारवाई; 80% सवलतीचा आज शेवटचा दिवस
01:52
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38
Video thumbnail
Latur Cyber Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 28 लाखांची फसवणूक; सहा आरोपी अटकेत
03:28
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
01:29

Latest news