दोन दिवसांत ७ गुन्हे दाखल, देशी, विदेशी दारु जप्त

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी निर्मिती आणि बेकायदेशीर मद्यविक्री पूर्णपणे हद्दपार करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेली विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी जिल्ह्यात एकाच वेळी कारवाया करत अवैध दारू व्यावसायिकांविरोधात ७ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवायांमध्ये हातभट्टी दारू, देशी दारू तसेच गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मोठ्या प्रमाणातील गुळमिश्रित फसफसते रसायन जप्त करून पंचासमक्ष नष्ट करण्यात आले. अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत.
लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत गजानन सदाशिव हेरकर (रा. नळेगाव, ता. चाकूर) याला ३५ लिटर हातभट्टी दारूसह पकडण्यात आले. त्याच दिवशी याच परिसरात अलीम सत्तार शेख (रा. झिन्नत सोसायटी, नांदेड रोड, लातूर) याला ३८ लिटर हातभट्टी दारूसह रंगेहात पकडण्यात आले. कासार सिरसी पोलीस ठाणे हद्दीतील कोराळवाडी येथे छापा  टाकला असता लक्ष्मण तिपन्ना उमापुरे याचे शेतातून सुमारे ५०० लिटर क्षमतेचे गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे गुळमिश्रित रसायन जप्त करण्यात आले.
अहमदपूर उपविभागातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीत इरफान मुन्नुसाब अत्तार (रा. शेळगाव, ता. चाकूर) याच्याविरुद्ध देशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून ‘भिंगरी संत्रा’ कंपनीच्या देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे गंगाराम रोहिदास माने (रा. वडगाव एक्की, ता. चाकूर) याच्याविरुद्धही अशाच स्वरूपाची कारवाई करण्यात आली असून देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जळकोट पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर देबडवार यांच्या शेताजवळ करण्यात आलेल्या कारवाईत शेख सलीम महेबुब (रा. नवी आबादी, जळकोट) याला देशी दारूच्या २१ बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी कोणताही वैध परवाना नसताना देशी दारूची चोरटी विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या सर्व कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या दारूचे व रसायनांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले असून उर्वरित अवैध साठा  नष्ट करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती व समाजविघातक धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाची कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणा-या आणि कायद्याचे उल्लंघन करणा-या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'शेवटची उडी' ठरली काळ; पोहायला गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
01:38
Video thumbnail
सुरत-धुळे हायवेवर काळजाचा थरकाप: दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
01:37
Video thumbnail
Latur|नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर लातुरात राष्ट्र सेवा दलाची गोलमेज परिषद
07:09
Video thumbnail
Latur|शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा 5-6 जूनला; रायगड सज्ज
03:56
Video thumbnail
Latur|क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; पिक विम्यावरून प्रशासनाला अल्टिमेटम
06:56
Video thumbnail
Latur|लातूर शहरात अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर; फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम वेगात
06:14
Video thumbnail
Nanded|शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुदखेड तहसीलवर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
03:21
Video thumbnail
एका चाकावर जग जिंकले! केरळच्या तरुणाची नेपाळपर्यंतची साहसी 'युनिसिकल' सफर
00:37
Video thumbnail
पहाटेचा थरार! माल्टामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात शक्तिशाली स्फोट; अनेक किलोमीटरपर्यंत जाणवले धक्के
01:04
Video thumbnail
भाडेकरार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक; 'टी.एस. विंड पॉवर' कंपनीच्या विरोधात तहसीलसमोर आमरण उपोषण
02:14
Video thumbnail
लातूर-बार्शी रोडवरील 'मोटेगावकर' यांचा कोट्यवधींचा प्लॉट चर्चेत; सीबीआयच्या रडारवर बेनामी मालमत्ता?
03:12
Video thumbnail
पीक विम्याचा घोळ: शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; जिल्हा कृषी अधीक्षकांना जमिनीवर बसवून केले आंदोलन
04:25
Video thumbnail
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट लढत; अर्ज दाखल
02:06
Video thumbnail
अमर राजूरकर यांचा भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल; ३०० पार मतांचा विश्वास
06:35
Video thumbnail
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद लाइव्ह
16:58

Latest news