पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सुशोभीकरणाचे काम पूर्ण

लातूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याला आणि प्रेरणादायी विचारांना अभिवादन करणारे लातूर शहराच्या अंबाजोगाई रोडवरील पू. अहिल्यादेवी होळकर चौक येथील  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे  सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून साकारलेल्या या उपक्रमामुळे परिसराला नवे सौंदर्य, वैभव आणि ऐतिहासिक ओळख प्राप्त झाली आहे. सदर काम माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून पूर्ण करण्यात आले आहे.
या सुशोभीकरणामध्ये आकर्षक वास्तुरचना, देखणी प्रकाशयोजना आणि परिसराच्या सौंदर्यात भर घालणारे विविध घटक विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे हा परिसर आता लातूरकरांसाठी अभिमानाचे आणि आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. शहरातील नागरिकांना तसेच बाहेरून येणा-या पाहुण्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची प्रेरणा देणारे हे स्मारक सर्वांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या उपक्रमामुळे इतिहासाचा गौरव जपत विकासाची वाटचाल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायप्रिय, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कार्याची आठवण करून देणारे हे सुशोभीकरण भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, परिसराच्या सौंदर्यात भर घालणा-या या कामाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'शेवटची उडी' ठरली काळ; पोहायला गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
01:38
Video thumbnail
सुरत-धुळे हायवेवर काळजाचा थरकाप: दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
01:37
Video thumbnail
Latur|नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर लातुरात राष्ट्र सेवा दलाची गोलमेज परिषद
07:09
Video thumbnail
Latur|शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा 5-6 जूनला; रायगड सज्ज
03:56
Video thumbnail
Latur|क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; पिक विम्यावरून प्रशासनाला अल्टिमेटम
06:56
Video thumbnail
Latur|लातूर शहरात अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर; फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम वेगात
06:14
Video thumbnail
Nanded|शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुदखेड तहसीलवर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
03:21
Video thumbnail
एका चाकावर जग जिंकले! केरळच्या तरुणाची नेपाळपर्यंतची साहसी 'युनिसिकल' सफर
00:37
Video thumbnail
पहाटेचा थरार! माल्टामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात शक्तिशाली स्फोट; अनेक किलोमीटरपर्यंत जाणवले धक्के
01:04
Video thumbnail
भाडेकरार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक; 'टी.एस. विंड पॉवर' कंपनीच्या विरोधात तहसीलसमोर आमरण उपोषण
02:14
Video thumbnail
लातूर-बार्शी रोडवरील 'मोटेगावकर' यांचा कोट्यवधींचा प्लॉट चर्चेत; सीबीआयच्या रडारवर बेनामी मालमत्ता?
03:12
Video thumbnail
पीक विम्याचा घोळ: शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; जिल्हा कृषी अधीक्षकांना जमिनीवर बसवून केले आंदोलन
04:25
Video thumbnail
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट लढत; अर्ज दाखल
02:06
Video thumbnail
अमर राजूरकर यांचा भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल; ३०० पार मतांचा विश्वास
06:35
Video thumbnail
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद लाइव्ह
16:58

Latest news