रजिस्ट्री कार्यालय परिसरातील अतिक्रमण पुन्हा काढले

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका अतिक्रमणविरोधी  पथक, महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील रजिस्ट्री कार्यालयाच्या परिसरातील अतिक्रमण दि. ३ जुलै रोजी पुन्हा एकदा काढण्यात आले. यामुळे रजिस्ट्री कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.
सरकारला मोठा महसूल मिळवून देणा-या या परिसरात दोन रजिस्ट्री (नोंदणी) कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या परिसरात मोठ्याप्रमाणात मुद्रांक विक्रेते, बॉण्ड रायटर यांनी टप-या टाकुन, टेबल मांडून अतिक्रमण केले होते. काहींनी तर वाहनाच्या पार्कींग शेडमध्येही अतिक्रमण केले होते. याच परिसरातील मोकळ्या जागेत चहा, नाष्टा इतकेच नव्हे तर शासनाने प्रतिबंध केलेला गुटखासुद्धा विकला जात होता. सुमारे ३-४ महिन्यांपुर्वी महानगरपालिकेने हेच अतिक्रमण काढले होते. परंतू, थोडा कालावधी जाताच पुन्हा पुर्वीप्रमाणेच अतिक्रमण झाले.
अतिक्रमण पुन्हा वाढल्याचे लक्षात येताच लातूर शहर महानगरपालिका अतिक्रमणविरोधी पथक, तहसील कार्यालय लातूर व पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करीत हे अतिक्रमण काढले. या परिसरात अक्षरश: मुद्रांक विक्रेत्यांनी अनधिकृतपणे पत्र्यांचे शेड मारले होते. जेसीबीच्या सहाय्याने पत्र्याचे सुमारे २० शेड उध्वस्त करण्यात आले. गेल्या काही दिवसांत मुद्रांक विके्रत्यांच्या दुकानांवर अशी कारवाई करण्यात आलेली आहे. वारंवार होत असलेल्या अशा कारवायांमुळे मुद्रांक व्यवसायिक संभ्रमात आहेत. प्रशासकीय इमारतीच्या परिसरात छोटे-छोटे हॉटेल्स मोठ्या प्रमाणात आहेत. चहा, नाष्टा, पान, तंबाखू, गुटखा, सिगारे सर्वच या ठिकाणी मिळते. शासनाच्या जागेवरच शासनाने प्रतिबंध केला गुटखा विकला जातो आहे. त्याचा त्रास शासकीय कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना होतो आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये मनपाचा बुलडोझर मोड! एका दिवसात ₹94,600 दंड वसूल
01:44
Video thumbnail
Latur|२ ऑगस्टला दशनाम गोसावी समाजाचा पंचसूत्री कार्यक्रम
04:43
Video thumbnail
Nanded|दोन लाखांची कर्जमाफी कुठे गेली?' शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल!
03:35
Video thumbnail
Nanded|'हवी ती चौकशी करा'; पेपरफुटीचे आरोप नेरलकरांनी धुडकावले
02:35
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50
Video thumbnail
Solapur|उजनी धरण 100 टक्के भरले; भीमा नदीत विसर्ग सुरू
00:23
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप!
08:31
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणासाठी लातूरमध्ये हजारोंचा एल्गार; महामोर्चाला मोठा प्रतिसाद!
03:32

Latest news