लातूर काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाची आज बैठक 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांची एक संयुक्त व महत्त्वपूर्ण बैठक आज दि. २१ जून रोजी दुपारी ४: वाजता काँग्रेस भवन,  येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार असून नवनिर्वाचित पदाधिका-यांचा भव्य सत्कार सोहळाही होणार आहे.
या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डॉ. वनकर यांची नुकतीच प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लातूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांची निवड झाली आहे. याबद्दल डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या हस्ते प्रा. डॉ. जवळगेकर यांचाही विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात येणार आहे. याचबरोबर, लातूरच्या नवनिर्वाचित महापौर सौ. जयश्री सोनकांबळे तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सहकार संस्थेतील संचालक आणि नगरपंचायत सदस्यांचाही याप्रसंगी सन्मान केला जाणार आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, या बैठकीदरम्यान पक्ष संघटन मजबुतीकरण, सदस्य नोंदणी अभियान, आगामी कार्यक्रमांचे नियोजन, स्थानिक प्रश्न तसेच विभागीय कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. या सत्कार समारंभ व बैठकीच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके हे उपस्थित राहणार आहेत. तरी या महत्त्वपूर्ण बैठकीला लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, तसेच लातूर शहर काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे सर्व प्रभाग अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांनी वेळेवर व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनु. जाती विभाग अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनु. जाती विभाग अध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूरवर पोलिसांचे राज्य की कोयता गँगचे?;भरदिवसा महिला आणि चिमुकल्यावर हल्ला
01:50
Video thumbnail
Latur|NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांचे मॉक ड्रिल
02:15
Video thumbnail
BIG BREAKING : यशवाडी मारुती मंदिरात सभागृहाचा भाग कोसळला;40 ते 50 भाविक जखमी
01:18
Video thumbnail
Latur|14,500 विद्यार्थ्यांचे स्वप्न पणाला; उद्या NEET ची महासंग्राम परीक्षा!
02:27
Video thumbnail
Latur|NEET घोटाळ्यावर लातूर पेटलं! गांधी चौकात धरणे आंदोलन
06:21
Video thumbnail
Latur|औसा नगरपरिषदेवर अफसर शेख पुन्हा विराजमान
04:48
Video thumbnail
Nanded|पिस्तूल असती तर गोळ्या घातल्या असत्या!" ठाकरे गटाच्या नेत्याचा संताप
02:46
Video thumbnail
Ashok Chavan On Udhav Thakre|उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं!–अशोक चव्हाणांचा थेट टोला
02:30
Video thumbnail
Pandharpur|गोपाळपूरमध्ये गुटख्याचा सुळसुळाट; प्रशासन झोपेत?
00:57
Video thumbnail
Latur|एल निनोचा प्रभाव; लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर
00:34
Video thumbnail
NEET UG 2026| लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर;जिल्हाधिकारी स्वतः मैदानात
03:18
Video thumbnail
युक्रेनचा रशियावर मोठा प्रतिहल्ला; मॉस्कोमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर भीषण ड्रोन हल्ला
00:27
Video thumbnail
भंडारदऱ्यात निसर्गाची जादू! लाखो काजव्यांच्या प्रकाशाने उजळले गर्द जंगल
00:27
Video thumbnail
अक्षय कुमारने घेतले माता वैष्णोदेवीचे दर्शन; जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे लावली हजेरी
01:09
Video thumbnail
Latur|फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
03:47

Latest news