शिरोळ-शेकापूर जोडरस्ता विकसित करण्याची मागणी

वलांडी : हसन मोमीन
लातूर जिल्ह्यातील निलंगा, देवणी व उदगीर या तीन तालुक्यांसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील दळणवळण अधिक गतिमान करणारा शिरोळ-शेकापूर जोडरस्ता तातडीने विकसित करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, वाहनधारक आणि भाविकांकडून होत आहे. सुमारे २९ किलोमीटर लांबीचा हा जोडमार्ग पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील महत्त्वाचा पर्यायी संपर्कमार्ग म्हणून त्याची ओळख निर्माण होणार असून वाहतूक, पर्यटन आणि ग्रामीण विकासास मोठी चालना मिळणार आहे.
सध्या निलंगा तालुक्यातील शिरोळ-वांजरवाडापर्यंत राज्य मार्ग उपलब्ध आहे मात्र त्यापुढील जवळगा-वाघनाळवाडी-सय्यदपूर (ता. देवणी) मार्गे हत्तीबेट-देवर्जन-शेकापूर (ता. उदगीर) हा मार्ग अद्याप पूर्णपणे विकसित झालेला नाही. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास निलंगा, देवणी आणि उदगीर या तीन तालुक्यांतील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. या जोडमार्गाचे विशेष महत्त्व म्हणजे जहिराबाद-लातूर राज्य मार्ग, प्रस्तावित गुलबर्गा-नांदेड राज्य मार्ग आणि आष्टामोड-उदगीर-निजामाबाद राज्य मार्ग हे तीन प्रमुख मार्ग परस्पर जोडले जाणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशकडे जाणा-या वाहतुकीस पर्यायी आणि कमी अंतराचा मार्ग उपलब्ध होईल. व्यापारी वाहतूक, कृषी मालाची ने-आण, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन प्रवासासाठीही या मार्गाचा मोठा लाभ होणार आहे.
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गावर उदगीर तालुक्यातील अ वर्ग तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ हत्तीबेट, शंभू उंबरगा येथील महादेव मंदिर, निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील हनुमान मंदिर, निळकंठेश्वर देवस्थान (निलंगा), शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कान्हेश्वर देवस्थान, तसेच देवणी तालुक्यातील मांजरा नदीकाठी वसलेले श्री रामलिंगेश्वर देवस्थान (जवळगा) अशी अनेक प्रसद्धि धार्मिक स्थळे आहेत. हा रस्ता पूर्ण झाल्यास ही सर्व तीर्थस्थळे एकमेकांशी सुलभपणे जोडली जातील आणि भाविक व पर्यटकांना कमी वेळेत दर्शनाचा लाभ घेणे शक्य होईल.
या मार्गामुळे लातूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार असून इंधनाची बचत, प्रवासाचा खर्च कमी होणे, वाहतुकीवरील ताण कमी होणे आणि ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक व व्यापारी व्यवहारांना गती मिळणे अपेक्षित आहे. सीमाभागातील गावांच्या विकासालाही या रस्त्यामुळे नवी संधी उपलब्ध होणार असल्याचे नागरिकांचे मत आहे. परिसरातील ग्रामस्थांनी या रस्त्यास प्राधान्याने प्रशासकीय मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करावा. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सर्वेक्षण करून काम हाती घ्यावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news