४१४ ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

लातूर : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या २६ मे, २०२६ च्या आदेशन्वये सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ या कालावधीत मुदत संपणा-या व नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, जळकोट, उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ, निलंगा, औसा या तालुक्यातील एकूण ४१४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार सोमवार, ८ जून रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येईल. शुकवार, १२ जून रोजी विशेष ग्रामसभा बोलावून, तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली, आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित होईल. बुधवार, १७ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला जिल्हाधिकारी यांनी मान्यता देतील. शुक्रवार, १९ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द केले जाईल. दि. १९ ते २५ जून या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करता येईल.
शुकवार, ३ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेवून अभिप्राय देणे, बुधवार, ८ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेवून अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देण्याची कार्यवाही केली जाईल. १० जुलै,  रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ) व्यापक प्रसिध्दी देण्यात येईल, असे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सायली ठाकूर यांनी कळविले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'शेवटची उडी' ठरली काळ; पोहायला गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
01:38
Video thumbnail
सुरत-धुळे हायवेवर काळजाचा थरकाप: दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
01:37
Video thumbnail
Latur|नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर लातुरात राष्ट्र सेवा दलाची गोलमेज परिषद
07:09
Video thumbnail
Latur|शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा 5-6 जूनला; रायगड सज्ज
03:56
Video thumbnail
Latur|क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; पिक विम्यावरून प्रशासनाला अल्टिमेटम
06:56
Video thumbnail
Latur|लातूर शहरात अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर; फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम वेगात
06:14
Video thumbnail
Nanded|शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुदखेड तहसीलवर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
03:21
Video thumbnail
एका चाकावर जग जिंकले! केरळच्या तरुणाची नेपाळपर्यंतची साहसी 'युनिसिकल' सफर
00:37
Video thumbnail
पहाटेचा थरार! माल्टामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात शक्तिशाली स्फोट; अनेक किलोमीटरपर्यंत जाणवले धक्के
01:04
Video thumbnail
भाडेकरार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक; 'टी.एस. विंड पॉवर' कंपनीच्या विरोधात तहसीलसमोर आमरण उपोषण
02:14
Video thumbnail
लातूर-बार्शी रोडवरील 'मोटेगावकर' यांचा कोट्यवधींचा प्लॉट चर्चेत; सीबीआयच्या रडारवर बेनामी मालमत्ता?
03:12
Video thumbnail
पीक विम्याचा घोळ: शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; जिल्हा कृषी अधीक्षकांना जमिनीवर बसवून केले आंदोलन
04:25
Video thumbnail
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट लढत; अर्ज दाखल
02:06
Video thumbnail
अमर राजूरकर यांचा भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल; ३०० पार मतांचा विश्वास
06:35
Video thumbnail
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद लाइव्ह
16:58

Latest news