27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeमहाराष्ट्रशरद पवार यांची प्रकृती स्थिर

शरद पवार यांची प्रकृती स्थिर

रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज

पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेतल्यानंतर, आज पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

रुबी हॉल क्लिनिकचे चेअरमन आणि प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉ. परवेझ ग्रांट यांनी पवारांच्या प्रकृतीची माहिती देताना सांगितले की, पवारांच्या रक्ताच्या चाचण्या आणि सीटी स्कॅनचे सर्व अहवाल सामान्य आहेत. उलट्यांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले होते, मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्णालयातून बाहेर पडताना शरद पवार यांनी सर्व डॉक्टर आणि कर्मचा-यांचे आभार मानत त्यांना अभिवादन केले. शरद पवारांना थकवा जाणवत असल्यामुळे आणि काही नियमित वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गेल्या चार दिवसांत तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली विविध चाचण्या पार पडल्या. या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट समाधानकारक आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सततचे दौरे आणि कामाच्या व्यापाचा प्रकृतीवर ताण येऊ नये, म्हणून डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR