41.2 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeलातूरआ.धीरज देशमुख यांची जानवळ, किनगाव येथे आज सभा

आ.धीरज देशमुख यांची जानवळ, किनगाव येथे आज सभा

चाकूर : प्रतिनिधी
आमदार धीरज विलासराव देशमुख यांची जाहीर आज दि २५ एप्रिल रोजी जानवळ येथे सांयकाळी पाच वाजता, किनगाव येथे सांयकाळी सात वाजता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील आणि महा विकास आघाडीचे घटक पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव ठाकरे या तीन्ही पक्षांचे पदाधिका-यांचा नियोजित दौरा ब्रम्हवाडी येथे सकाळी ८,अलगरवाडी येथे सकाळी ९ वाजता, हाणमंतवाडी तांडा सकाळी ९.३० वाजता, हानमंतवाडी सकाळी १० वाजता, शिरनाळ सकाळी १०.३० वाजता ,मशनरवाडी सकाळी ११.३० वाजता. प्रचार दौरा होणार आहे. शेवटी सायंकाळी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांची जाहीर सभा जानवळ येथे सांयकाळी पाच वाजता,किनगाव येथे – सांयकाळी सात वाजता आयोजित केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR