38.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeलातूरकाँग्रेसचे नेते राहूल गांधी लातूर मुक्कामी, काँग्रेस पक्ष पदाधिका-यांनी केले उत्स्फूर्त स्वागत

काँग्रेसचे नेते राहूल गांधी लातूर मुक्कामी, काँग्रेस पक्ष पदाधिका-यांनी केले उत्स्फूर्त स्वागत

लातूर : प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहूलजी गांधी  दि. २४ एप्रिल रोजी लातूर मुक्कामी थांबले आहेत. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख तसेच लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा तसेच जिल्ह्यातील माजी आमदार काँग्रेस पक्ष पदाधिकारी यांनी त्यांचे लातूर विमानतळावर स्वागत केले.
काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे बुधवारी दुपारी  सोलापूरला जाण्यासाठी अमरावती येथून विमानाने लातूर विमानतळावर आगमन झाले. याठिकाणी आमदार धिरज देशमुख, लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा, माजी आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. लातूर येथून काँग्रेस नेते राहूल गांधी हॅलीकॉप्टरने सोलापूर येथील सभेला रवाना झाले. सोलापूर येथील सभा आटोपून काँग्रेस नेते राहूल गांधी पून्हा लातूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख व मान्यवर नेत्यांनी त्यांचे स्वागत केले, व त्यांना लातूर येथील गॅ्रड हॉटेल येथे घेऊन आले.
या भेटीत काँग्रेस नेते राहूल गांधी व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्यामध्ये महाष्ट्रातील एकूण सद्याची राजकीय परिस्थिती, निवडणूक प्रचार यंत्रणा, काँग्रेस व महाविकास आघाडीला मिळत असलेला प्रतिसाद यावर चर्चा केली. लातूर येथील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रचार यंत्रणा या संदर्भाने माहीती घेऊन डॉ. शिवाजी काळगे यांना राहूल गांधी यांनी विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अ‍ॅड. समद पटेल, व्हाईस चेअरमन रवी काळे, मोईज शेख, अ‍ॅड. दीपक सुळ, विक्रात गोजमगुंडे, संतोष देशमुख, अमर खानापूरे, अभय सांळुके, लक्ष्मण कांबळे, अनुप शेळके, सर्जेराव मोरे, इम्रान सय्यद, सचिन बंडापल्ले, व्यकंटेश पुरी, प्रविण सुर्यवंशी, अ‍ॅड. प्रमोद जाधव, मुकेश राजेमाने, प्रा. एकनाथ पाटील, मनोज राठोड, राम स्वामी, कुणाल श्रृगारे, राम गोरड, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR