35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूरनेहा हिरेमठच्या मारेक-यास फाशीची शिक्षा द्या

नेहा हिरेमठच्या मारेक-यास फाशीची शिक्षा द्या

निलंगा : प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील हुबळी येथे झालेल्या नेहा हिरेमठच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस  फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निलंगा येथील ंिलगायत समाज व जंगम समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी निलंगा यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे . कर्नाटकातील हुबळी येथील नेहा हिरेमठ या विद्यार्थ्यांनीचे एकतर्फी प्रेमातून एमबीए ची परीक्षा देऊन घरी जात आसताना नराधम संशयीत आरोपी फैय्याज याने तिच्यावर हल्ला करुन  खून केला.
या निर्घृण हत्येचा निलंगा येथील जंगम समाज व ंिलंगायत समाजाच्या वतीने निषेध नोंदवत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले . हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून  आरोपीस फाशी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आले आहे . निवेदनावर सुर्यकांत पत्रे, शिवाजी रेशमे गुरुजी, माजी नगराध्यक्ष विरभद्र स्वामी, माजी उपनगाध्यक्ष मनोज कोळ्ळे, श्रीशैल्य बिराजदार, काशिना आग्रे, दिलीप स्वामी, सुमनताई डांगे ,प्रकाश पटणे, सिद्धू सोरडे, रत्नेश्वर गताटे, इंजी. मारोती कस्तुरे, अ‍ॅड अमर हत्ते, संतोष सोरडे,  महेश शेटकार, कैलास मठपती, कल्पक गरीबसे, नागनाथ सोरडे, संजय स्वामी, आकाश स्वामी, बस्वराज मठपती, विवेक महाराज स्वामी, बाबुराव बावगे, सोमनाथ पाटील, एन.आर स्वामी , विरभद्र सोरडे, प्रकाश स्वामी ,प्रशांत सोरडे,कमठाणे संगय्या, सोमनाथ स्वामी, रमाकांत कोळ्ळे, अ‍ॅड वलांडे ,दिनेश कुडुंबले, निला परमेश्वर,संतोष स्वामी,कुमार स्वामी,राजकुमार निला,शिवाजी भुरके यांच्या स्वाक्ष-या आहेत.
या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत अखिल भारतीय छावा मराठा संघटनांच्या वतीने वैभव गोमसाळेसह पदाधिकारी यांनी मारेक-यांंना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. निलंगा शहरात अशा पद्धतीची घटना घडु नये म्हणून पोलीसांनी स्पेशल पथकांची नेमणुक करुन शालेय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व महीलांना सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आले आहे.   उपजिल्हाधीकारीच्या वतीने नायब तहसीलदार आर .के.कराड यांनी निवेदन स्विकारले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR