एसटी महामंडळाच्या मोक्याच्या १४८५ हेक्टरचे खाजगीकरण?

राज्य सरकारचा घाट, पीपीपी तत्त्वावर विकसित करणार?
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील एसटी महामंडळाच्या मालकीच्या राज्यभरातील तब्बल १४८५ हेक्टर मोक्याच्या जागांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एसटी महामंडळाच्या बस डेपो आणि आगारांच्या या मौल्यवान जागा सार्वजनिक-खासगी भागीदारी म्हणजेच पीपीपी तत्त्वावर विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण सादरीकरण केले जाणार आहे.

परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांसमोर हा संपूर्ण आराखडा सादर करणार असून, या बैठकीनंतर मुख्यमंत्री या जागांच्या भवितव्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागांचा व्यावसायिक विकास करण्याचे संकेत दिले होते. एसटी महामंडळाकडे राज्यभरातील अनेक शहरांमध्ये बसस्थानके, बस आगार आणि मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत. या जागांचा व्यावसायिक वापर करून महामंडळासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याचा सरकारचा विचार होता. त्यासाठी पीपीपी मॉडेलचा वापर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

यापूर्वी परिवहन विभागाच्या बैठकीत राज्यातील एसटी महामंडळाच्या जागांचा ७२ पॅकेजमध्ये विकास करण्याचा आराखडा मांडण्यात आला होता. यामध्ये शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागांतील बसस्थानके व आगारांचा समावेश करण्याची योजना होती. जागांचे अ (अ), ब (इ) आणि क (उ) अशा वर्गांमध्ये वर्गीकरण करून त्यांचे एकत्रित पॅकेज तयार करण्याचा प्रस्ताव होता.

मुख्यमंत्र्यांच्या
निर्णयाकडे लक्ष
उत्पन्न वाढविण्याच्या नावाखाली एसटीच्या मालकीच्या हक्काच्या जमिनी खासगी बिल्डरांच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोप होण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणा-या या बैठकीनंतर फडणवीस नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56
Video thumbnail
Solapur|सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
01:42
Video thumbnail
Latur|नागलगाव परिसरातील पाझर तलाव कोरडे, जनावरांवर पाणीटंचाईचे संकट
01:15
Video thumbnail
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातील विहंगम सोहळा, डोळे दिपवून टाकणारा व्हिडिओ
00:40

Latest news