लातूर : प्रतिनिधी
सीबीएसई व सेमी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये शैक्षणिक पात्रता नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणा-या संस्थांवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी संभाजी सेना विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल कांदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद लातूर यांच्या कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.
यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊन तसेच आंदोलने करूनही शिक्षण विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तसेच सेवा नियमांचे उल्लंघन करून अनेक खासगी शाळांमध्ये अपात्र शिक्षकांकडून अध्यापन सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असून अपात्र शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असून पालकांची आर्थिक लूटही होत आहे. त्यामुळे अशा शाळा व संस्थाचालकांवर कठोर कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी प्रदेश प्रवक्ते राजकुमार साळुंखे, मराठवाडा उपाध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख धर्मराज पवार, जिल्हाध्यक्ष योगेश देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मदन पाटील, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल कांदे, विद्यार्थी आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद पवार, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत माने, जिल्हा संघटक सिद्धाजी माने, जिल्हा सचिव गजानन मुंगळे, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष सत्यपाल जाधव, ऑटो युनियन जिल्हाध्यक्ष अंकुश बिराजदार, शहराध्यक्ष किरण मुक्तापुरे, जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश निकम, औसा तालुकाध्यक्ष मोहन माळी, रेनापुर तालुकाध्यक्ष सुरेश चव्हाण, निलंगा तालुकाध्यक्ष बबन राजे, शहर कार्याध्यक्ष किसन गडगळे, विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रितेश चव्हाण, लातूर तालुकाध्यक्ष उमाकांत वायाळ, लातूर विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष निखिल जगताप, विद्यार्थी आघाडी रेनापुर तालुका अध्यक्ष नवनाथ शिंदे, औसा शहराध्यक्ष गणेश तिडके, ऑटो युनियन शहराध्यक्ष सचिन मळगे, ऑटो युनियन जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत पांढरे, जिल्हा सचिव बालाजी घोडके, रेनापुर तालुका कार्याध्यक्ष एकनाथ काळे, विद्यार्थी आघाडी औसा तालुका अध्यक्ष अक्षय पवार, ज्ञानेश्वर बेदरे,कैलास सावंत, कैलास कांबळे, बालाजी सूर्यवंशी, इलाही शेख, निवृत्ती मुंडे, नेताजी भोसले, अजय पवार आदी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
















