कच-याचे योग्य व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्ती ही आजची सर्वात मोठी गरज

लातूर : प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (एन. सी. सी.) विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि पर्यावरण जागृती निर्माण करण्यासाठी ‘ओरिगामी, वेस्ट टू वेल्थ आणि वेस्ट टू वंडर’ या विषयांवर एका विशेष कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुली व मुले मिळून एकूण ६३ एनसीसी कॅडेटसनी प्लास्टिकला उत्तम पर्याय म्हणून कागदी पिशव्यांची निर्मिती केली आणि त्यांचे सामाजिक वाटप करून एक नवा आदर्श घालून दिला. यावेळी बोलताना कर्नल वाय. बी. सिंग म्हणाले, कच-याचे योग्य व्यवस्थापन आणि प्लास्टिक मुक्ती ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.
कार्यशाळेदरम्यान एनसीसी कॅडेटसनी टाकाऊ कागद आणि वर्तमानपत्रांचा वापर करून अत्यंत मजबूत व आकर्षक पिशव्या तयार केल्या. केवळ पिशव्या बनवून न थांबता, विद्यार्थ्यांनी या पिशव्या स्थानिक भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी विक्रेत्यांना आणि ग्राहकांना मोफत वाटल्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा’आणि ‘उत्तम आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळा’, असा महत्त्वपूर्ण संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे बाजारातील व्यापारी व नागरिकांनी मनापासून कौतुक केले.
कर्नल वाय. बी. सिंग यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.  त्यांनी कॅडेटसना मार्गदर्शन करताना सिंग यांनी सांगितले की,  एनसीसी कॅडेटसनी कृतीतून दिलेला हा संदेश कौतुकास्पद आहे. साधन व्यक्ती डॉ. कल्याण सावंत म्हणाले की, आजच्या काळात टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ आणि कलात्मक गोष्टी बनवणे ही काळाची गरज आहे.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे हे होते. ते म्हणाले की, शिक्षण केवळ पुस्तकी न राहता ते समाजासाठी उपयोगी पडले पाहिजे, हेच या उपक्रमातून दिसून येते. महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे सुभेदार संजय चिकने, सुभेदार संतोष पाटील, हवालदार संतोष शिंदे  हे देखील याप्रसंगी उपस्थित होते. त्यांनी कॅडेट्सच्या शिस्तीचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे देशाचा सुजाण नागरिक घडण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्ट. डॉ. महेश वावरे, लेफ्ट. डॉ. अर्चना टाक यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.  श्रद्धा निकम, वैष्णवी मुक्तापुरे, कॅडेट शुभम मरसुने, कॅडेट जैद सय्यद यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कॅडेट रोहिणी स्वामी हिने सूत्रसंचालन केले तर कॅडेट प्रेरणा लंगर हिने आभार व्यक्त केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56
Video thumbnail
Solapur|सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
01:42
Video thumbnail
Latur|नागलगाव परिसरातील पाझर तलाव कोरडे, जनावरांवर पाणीटंचाईचे संकट
01:15
Video thumbnail
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातील विहंगम सोहळा, डोळे दिपवून टाकणारा व्हिडिओ
00:40

Latest news