लातूर : प्रतिनिधी
राज्यातील शेतक-यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लातूरमध्ये जल्लोष साजरा केला. आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचा दावा करत कार्यकर्त्यांनी पेढे वाटले आणि फटाक्यांची आतषबाजी केली.
राज्यातील शेतक-यांच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शेतकरी आणि नागरिकांना पेढे वाटले तसेच फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष व्यक्त केला. यावेळी आमदार रोहित पवार यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच हा निर्णय झाल्याचा दावा करण्यात आला. तसेच शेतक-यांच्या हितासाठी पक्ष भविष्यातही संघर्ष सुरू ठेवणार असल्याचा विश्वास पदाधिका-यांनी व्यक्त केला.
















