35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिवकिडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये मनसे टाका...

किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये मनसे टाका…

ओमराजे निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला

धाराशिव : प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला. २०१९ ला अजित पवार यांच्या सहमतीने डॉ. पाटील परिवाराने राष्ट्रवादी सोडत भाजपात प्रवेश केला. आमच्या रक्तात राष्ट्रवादी आहे आणि हृदयात भाजप…असे वक्तव्य केले. याच वक्तव्यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील आणि पुत्र मल्हार पाटील यांना किडनीत शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसे टाका म्हणजे शरीरात सगळे पक्ष गेले की, कोणत्याही पक्षात जायला मोकळे असा टोला लगावल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, धाराशिव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला. २०१९ ला अजित पवार यांच्या सहमतीने आमच्या परिवाराने राष्ट्रवादी सोडली. आमच्या रक्तात राष्ट्रवादी आहे आणि हृदयात भाजप तर हातात धनुष्यबाण आहे, असे मल्हार पाटील यांनी म्हटले होते. मल्हार पाटील यांच्या वक्तव्यावर खासदार ओमराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी पाटील परिवारावर टीका करत असे म्हटले की, राष्ट्रवादी का वाढवू यावर अजित दादा यांनी कमळाने यांना हाणले असेल. रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप असे मल्हार पाटील म्हणतात तर किडनीत शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसे टाका म्हणजे शरीरात सगळे पक्ष गेले की कोणत्याही पक्षात जायला मोकळे, असा खोचक टोलाही ओमराजे निंबाळकर यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR